SSC Result: रस्त्यावर अभ्यास करून तिने दहावीला मिळवले ४० टक्के

SSC Result: रस्त्यावर अभ्यास करून तिने दहावीला मिळवले ४० टक्के

आसमा शेखने फुटपाथवर अभ्यास केला

महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल ३ टक्क्यांनी अधिक आहे. राज्यातील सर्व मुलींचे कौतुक होत असताना मुंबईतही एका मुलीचे कौतुक होत आहे. आसमा सलीम शेख या मुलीने फुटपाथवर अभ्यास करुन दहावीच्या परिक्षेत ४० टक्के गुण मिळवले आहेत. अभ्यासासाठी फारशी साधने आणि वातावरण नसताना या मुलीने मिळवलेले यश हे अनन्यसाधारण आहे. फेरीवाले असलेल्या आसमाचे वडिल मुलीला लाडू भरवतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मनात जिद्द असेल तर परिस्थिती विरोधात असतानाही आपण यश मिळवू शकतो, हा विश्वास आसमाने खरा करुन दाखवला आहे.

मुंबईच्या सीएसटी स्थानकासमोर किला कोर्ट या परिसरात आसमाचे कुटुंबिय फुटपाथवर जीवन व्यतित करतात. तिचे वडील सरबत विक्रीचा धंदा करतात. परंतु लॉकडाऊनमुळे तोही बंद आहे. लेकीच्या या कामगिरीमुळे तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. याच फुटपाथवर तिने दिवसभर अभ्यास करून दहावीत ४० टक्के गुण मिळवले. रस्त्यावर राहणाऱ्या आसमाने यश मिळवल्याने तिचे कोर्ट परिसरात कौतुक होत आहे.

 

आसमा सलीम शेख

राज्यात कोरोनाचे संकट नुकतेच सुरु झाले तेव्हा दहावीची परिक्षा सुरु होती. अखेर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या विषयात विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले आहेत.

First Published on: July 29, 2020 4:37 PM
Exit mobile version