एका वडापावसाठी खुनाचा प्रयत्न, आरोपीला अटक

एका वडापावसाठी खुनाचा प्रयत्न, आरोपीला अटक

भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात वडापाव खाण्यासाठी पैसे दिले नाही या करणावरुन एका तरुणावर चाकूने हल्ला करून मारण्याचा प्रयत्न कऱण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

असा घडला प्रकार

वयवर्ष ३२ असणारा मुकीम फकीर अन्सारी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुकीम हा भिवंडीतील नदीनाका येथील म्हाडा कॉलनी येथे राहण्यास आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारा मुकीम हा बुधवारी सायंकाळी अवचित नाका या ठिकाणी एका मित्रांसोबत वडापाव खाण्यासाठी आला होता, त्याच वेळी लक्की उर्फ जावेद सिद्दीकी हा त्या ठिकाणी आला व त्याने मुकीमकडे वडापाव खाण्यासाठी पैसे मागितले. मात्र मुकीमने त्याला पैसे न देता तेथून हाकलले.

काही वेळाने लक्की हा शानदार हॉटेल या ठिकाणी परत आला ‘तुने मुझे वडापाव खाने, को पैसे नही दिया, असे बोलून कमरेत लपवलेला चाकू काढून मुकीमच्या पोटावर, छातीवर चाकूने वार करून तेथून पळून गेला.

तरूणाची प्रकृती चितांजनक

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुकीमला त्याच्या मित्राने तेथील लोकांच्या मदतीने जवळच्या रुग्नालयात आणले, मात्र मुकीम हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात सांगितले, मुकीमला उपचारासाठी कळवा रुग्णालय येथे दाखल कऱण्यात आलेले असून त्याची प्रकृती चितांजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

या प्रकरणी शांती नगर पोलीस ठाण्यात लक्की उर्फ जावेद सिद्दीकी याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आलेला असून आरोपीला अटक कऱण्यात आलेली असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एल. डिसोझा यांनी दिली.


गाडीच न मिळाल्याने 22 महिलांची घरीच प्रसूती
First Published on: May 7, 2020 7:35 PM
Exit mobile version