घरताज्या घडामोडीगाडीच न मिळाल्याने 22 महिलांची घरीच प्रसूती

गाडीच न मिळाल्याने 22 महिलांची घरीच प्रसूती

Subscribe

महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी घेतला आढावा

नाशिक : राज्यात लॉकडाऊनच्या काळात गर्भवती माता, बाल मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील 22 महिलांची प्रसूती विविध कारणांमुळे घरी किंवा अन्य ठिकाणी झालेली आहे. याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी तातडीने विभागातील अधिकार्‍यांची बैठक घेत आढावा घेतला. गर्भवती माता व बालकांची आरोग्य तपासणी करावी, असे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी बालप्रकल्प अधिकार्‍यांशी संवाद साधला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्चपासून राज्यभरात लॉकडाउन सुरू आहे. गरोदर मातांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गरोदर मातांचे सर्वेक्षण झाले. ग्रामीण व आदिवासी भागात 28 हजार 738 गरोदर मातांची नोंदणी झालेली होती. त्यापैकी चार हजार 873 गरोदर स्त्रियांची प्रसूती झाली आहे. त्यापैकी चार हजार 851 गरोदर मातांची प्रसूती शासकीय संस्था म्हणजेच शासकीय दवाखाने व खासगी दवाखान्यात झालेली आहे. 15 मेपर्यंत संभाव्य गरोदर स्त्रियांची प्रसूती तीन हजार 242 असून सर्व महिलांची नोंदणी शासकीय संस्थात्मक म्हणजे शासकीय अथवा खासगी दवाखान्यात होण्यासाठी दक्षता घेण्यात यावी, असे सभापती आहेर यांनी विभागातील कार्यरत पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका आशा वर्कर यांना सांगितले. सर्व गरोदर महिलांची प्रसूती ही दवाखान्यातच करण्याबाबत आरोग्य व महिला बालकल्याण विभाग काळजी घ्यावी, गर्भवती माताचा मृत्यू होता कामा नये. तसेच जन्माला आलेल्या बालकांची काळजी घेण्यात यावी असे आदेश सभापती आहेर यांनी अधिकार्‍यांना दिले.
&
गाडीच उपलब्ध झाली नाही
ग्रामीण भागातील रुग्णांसाठी 108 ही रुग्णवाहिका आरोग्यवाहिनी ठरली आहे. परंतु, लॉकडाऊनच्या काळात रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही म्हणून 22 महिलांची घरीच प्रसूती झाली. यातील काही महिलांचा अचानक एचबी वाढल्याने त्यांची गाडीतच प्रसूती करावी लागल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -