कंगनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा? देशद्रोहाच्या आरोपामुळे प्राधिकरणाचा पासपोर्ट नुतणीकरणास नकार

कंगनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा? देशद्रोहाच्या आरोपामुळे प्राधिकरणाचा पासपोर्ट नुतणीकरणास नकार

कंगनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा? देशद्रोहाच्या आरोपामुळे प्राधिकरणाचा पासपोर्ट नुतणीकरणास नकार

बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) सतत काही ना काही कारणांवरुन चर्चेत असते. कंगनाच्या बेताल वक्तव्यामुळे कंगना नेहमीच अडचणीत सापडत असते. आता पुन्हा कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंगनाने केलेला देशद्रोहाचा आरोप तिला चांगलाच महागात पडला आहे. कंगनावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला सुरु असल्याने कंगनाच्या पासपोर्ट नुतणीकरणास प्राधिकरणाने नकार दिला आहे. (Authority refuses to renew Kangana Ranaut’s passport due to treason charges) देशद्रोहाच्या आरोपामुळे कंगानाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक लागण्याची किंवा त्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. परंतु कंगनाचा इतिहास पाहता ती शांत बसणार नाही. पासपोर्ट रिन्यूची मागणी करत कंगनाने पुन्हा एकदा बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. (kangana moves bobmbay high court to renew passport)

पासपोर्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगनावर आक्षेपार्य ट्विट आणि देशदोहाच्या आरोपाखाली वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये खटला सुरु आहे. त्यामुळे कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करता येणार नाही. मात्र कंगनाने शांत न बसता बॉम्बे हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. देशद्रोहाच्या खटल्याखाली उच्च न्यायालयाने कंगनाला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कंगनाची बहिण रंगोली हिचा देखील समावेश आहे.

कंगनाच्या पासपोर्टची शेवटची मुदत ही सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. कंगनाच्या आगामी प्रोजेक्टसाठी तिला एका आंतराराष्टीय दौऱ्यावर जायचे आहे. तिच्या पुढील सिनेमात तिला मुख्य भुमिका मिळाली आहे. त्या सिनेमाच्या शुटींगसाठी कंगनाला बुडापेस्टला जायचे आहे. त्यामुळे तिला तिचा पासपोर्ट रिन्यू करायचा असल्याचे कंगनाने म्हटले आहे. कंगनाच्या बेताल वक्तव्यांमुळे ती नेहमीच अडचणीत येत असते. आता देशद्रोहाच्या आरोपामुळे कंगनाचा आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा येणार का पहावे लागणार आहे.


हेही वाचा – राखीचा ड्रामा कधी संपणार? राखीची अजब योगा स्टाईल चर्चेत

 

 

 

 

First Published on: June 15, 2021 8:19 AM
Exit mobile version