उड्डाणपुलासाठी अडथळा ठरणारा वांद्रे स्कायवॉक तोडकामास सुरुवात

उड्डाणपुलासाठी अडथळा ठरणारा वांद्रे स्कायवॉक तोडकामास सुरुवात

वांद्रे स्कायवॉक

वांद्रे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या पहिल्या स्कायवॉक तोडण्याच्या कामाला काल रात्रीपासून सुरुवात झाली. वांद्रे-वरळी सी लिंक ते वांद्रे-कुर्ला- संकुल या उड्डाणपुलाच्या कामामध्ये हा स्कायवॉक अडथळा ठरत होता. त्यामुळे या स्कायवॉकचा काही भाग पाडण्यात येत आहे. या कामासाठी स्कायवॉक बंद ठेवण्यात आला आहे. स्कायवॉकचा दक्षिणेकडील भाग तोडण्याचे काम शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ५ वाजेपर्यंत तोडण्यात येणार आहे. तर उत्तरेकडील भाग रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ५ दरम्यान तोडण्यात येणार आहे.

स्कायवॉक पाडण्याचे काम सुरु

वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेचा हा स्कायवॉक २००८ साली म्हणजे १० वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. या स्कायवॉकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दरम्यान, हा स्कायवॉक आता पाडण्यात येणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. उड्डाणपूलाच्या कामामध्ये अडथळा ठरणारा स्कायवॉकचा १०० मीटरचा भाग तोडण्यात येत आहे. कलानगर वांद्रे येथे एमएमआरडीएने उड्डाणपूलाचे काम हाती घेतले आहे. बीकेसी ते वांद्रे दरम्यानच्या उड्डाणपूलाच्या कामासाठी १०० कोटी रुपये प्राधिकरणाने मंजूर केले आहे.

गर्दी कमी करण्यासाठी नव्या रस्त्याचे नियोजन 

वांद्रे-वरळी सी-लिंकपासून वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडण्यासाठी सुमारे ७१४ मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी दोन फ्लायओव्हर बांधण्याचे काम एमएमआरडीए मार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १६३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही पुलांची लांबी वांद्रे-कुर्ला संकुल ते सी लिंक आणि सी लिंक ते वांद्रे कुर्ला संकुल अशी १८८८ मीटर इतकी आहे. धारावी ते सी लिंक या मार्गावर गर्दी कमी व्हावी या उद्देशाने आणखी एक १२ फुट रूंद आणि ३०० मीटर लांबीच्या एका रस्त्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे.

हेही वाचा – 

वांद्रे स्कायवॉकच्या काही भागावर हातोडा; २५ मार्चपासून राहणार बंद

वांद्रे स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट २ दिवसांत पूर्ण

First Published on: June 23, 2019 11:57 AM
Exit mobile version