BMC चं पहिलं स्वयंचलित वाहनतळ; २१ मजलींसह २४० वाहन क्षमतेचे ‘पार्किंग’ मुंबईकरांच्या सेवेत

BMC चं पहिलं स्वयंचलित वाहनतळ; २१ मजलींसह २४० वाहन क्षमतेचे ‘पार्किंग’ मुंबईकरांच्या सेवेत

BMC चं पहिलं स्वयंचलित वाहनतळ; २१ मजलींसह २४० वाहन क्षमतेचे ‘पार्किंग’ मुंबईकरांच्या सेवेत

एका बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणा-या एका भव्य पोलादी ‘प्लेट’ वर एक कार उभी केली जाते. कारची नोंद पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणा-या रिसेप्शन काऊंटरवर संगणकीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर ज्या पोलादी प्लेटवर कार उभी असते, ती प्लेट स्वयंचलित पद्धतीने कारसह वाहनतळामध्ये प्रवेश करते. यानंतर तब्बल २१ मजली वाहनतळामध्ये असणा-या भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते. ज्यानंतर २१ मजल्यांपैकी ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या मजल्यावरील पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क केली जाते. याचप्रकारे पार्किंगमधून कार बाहेर काढताना देखील रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच ‘कार’ बाहेर पडते. हे एखाद्या विदेशी चित्रपटातील दृश्याचे वर्णन नसून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे वास्तव आहे.

रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित व नूतनीकरण करण्यात आलेल्या या स्वयंचलित सार्वजनिक वाहनतळाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मा. पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवार, दिनांक २४ जून २०२१ रोजी हा लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या नूतनीकृत वाहनतळ लोकार्पण कार्यक्रमाला स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, सी आणि डी विभागांच्या प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त  प्रशांत गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध जागेचा अधिकाधिक सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न, नियोजन व अंमलबजावणी करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्ग येथे असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील आज लोकार्पित करण्यात आलेल्या नूतनीकृत वाहनतळाबाबत मुद्देनिहाय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहेः-


भाजपचं टार्गेट आता अजित पवार; परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

First Published on: June 24, 2021 6:05 PM
Exit mobile version