Best Bus strike: मनसेच्या दणक्यानंतर बेस्ट प्रशासनाला जाग, थकीत वेतन कर्मचाऱ्यांच्या हाती

Best Bus strike: मनसेच्या दणक्यानंतर बेस्ट प्रशासनाला जाग, थकीत वेतन कर्मचाऱ्यांच्या हाती

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यानंतर आता मुंबईत बेस्टमधील भाडेतत्वावर असलेल्या बस चालकांनीसुद्धा संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. बेस्टने नेमलेल्या वेटलिस्ट कंत्राटदार एम. पी ग्रुप याने कामगारांचं गेल्या ३ महिन्यांचं वेतन केलं नव्हतं. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने बेस्ट अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला काल चांगलंच फैलावर घेतलं होतं. अखेर मनसेच्या दणक्यानंतर बेस्ट प्रशासनाला जाग आली आहे. यानंतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यात आले आहे.

बेस्टने नेमलेल्या वेटलिस्ट कंत्राटदार एम. पी ग्रुपने कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या ३ महिन्यांपासून थकवलं होते. मनसेने बेस्ट अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला काल चांगलंच फैलावर घेतलं होतं. मनसे कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी बांद्रातील बेस्ट डोपोला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जर एका दिवसात या कामगारांचे थकीत वेतन झाले नाही तर कामगार आज बेस्ट भवनावर धडकतील असा इशारा केतन नाईक यांनी बेस्ट पदाधिकारी आणि कंत्राटदार यांना दिला आहे. दरम्यान, आज मनसेच्या या दणक्यानंतर बेस्ट मधल्या कामगारांचे ३ महिन्यांचे थकीत पगार झाले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

बेस्टने नेमलेल्या वेटलिस्ट कंत्राटदार एम. पी ग्रुप याने कामगारांचं गेल्या ३ महिन्यांचं वेतन केलं नाही आहे. इतकचं नाही तर पी. एफ, ई. एस. आय. सी या किमान कामगार सुविधाही दिल्या नाही आहेत. या सगळ्या त्रासाला कंटाळून कामगारांनी कामबंद आंदोलन केलं आहे. वडाळा, कुर्ला, बांद्रा आणि विक्रोळी या डेपोमधील सर्व वेटलिस्ट कामगारांनी बसेस उभ्या करत कामबंद आंदोलन पुकारलं होतं. जर का एका दिवसात कामगारांचं वेतन झालं नाही तर उद्या कामगार बेस्ट भवनावर धडकणार असा धमकी वजा इशारा मनसेकडून देण्यात आला होता.

दरम्यान, बेस्टच्या चालकांनी दुसऱ्या दिवशीही वेतन न मिळाल्यामुळे आंदोलन सुरुच ठेवलं आहे. कामगारांनी कंत्राटदाराच्या विरोधात संपाचे हत्यार उपसल्यामुळे मुंबईतील हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबईतील एकुण पाच डेपोमधून ५०० बस चालकांनी बसेस बाहेर काढल्या नाहीत. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

एम् पी ग्रूपच्या कंत्राट दाराकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या १७५ बसगाड्या वेळापत्रकानुसार चालविणे आवश्यक होते. परंतु कामगारांचे वेतन न दिल्यामुळे वडाळा वांद्रे आणि विक्रोळी या आगारांमधून आज एकही बस गाडी आतापर्यंत बाहेर पडलेली नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमाने इतर मार्ग तसेच इतर आगारांमधून स्वतःच्या ८६ बस गाड्या चालवल्या आहेत. सदर कंत्राटदार विरुद्ध कंत्राटातील अटी आणि शर्ती नुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया बेस्ट उपक्रमाचे प्रवक्ते मनोज वराडे यांनी दिली. दंड वसुली, कंत्राट रद्दबातल करणे यापैकी जे कंत्राटामध्ये परिस्थिती अनुरूप मान्यताप्राप्त असेल तशी कारवाई प्रशासन करेल, असेही त्यांनी सांगितले होते.


हेही वाचा : Best Bus strike: सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, मुंबईकरांचे हाल

First Published on: April 22, 2022 6:30 PM
Exit mobile version