बेस्ट कर्मचाऱ्यांचा ‘दिवाळी बोनस’ कागदावरच!

बेस्ट कर्मचाऱ्यांचा ‘दिवाळी बोनस’ कागदावरच!

प्रातिनिधिक फोटो

बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदाच्यावर्षी ५,५०० रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला होता. मात्र, दिवाळी संपूनही बेस्ट कर्मचऱ्यांना अद्याप त्यांचा बोनस मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बोनस केवळ कागदावरच राहिला असून बेस्ट प्रशसाननं दिलेलं वचन न पाळल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, प्रशासकीय तरतूद न झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना कबूल करण्यात आलेला पगार अद्याप देऊ न शकल्याचं स्पष्टीकरण बेस्ट प्रशासनाने दिलं आहे. मात्र, प्रशासनाची बोनसची घोषणा हवेतच विरल्यामुळे बेस्ट कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सध्या बेस्ट आर्थिक तोट्यात असून, बेस्टला ४० हजार कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी तब्बल २२ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, अशी परिस्थीती असताना मग बेस्ट प्रशासनाने दिवाळीचा बोनस जाहीर केलाच का? असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दिवाळीच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत बोनसची वाट पाहणारे बेस्ट कर्मचारी बोनस न मिळाल्यामुळे आता नाराज झाले आहेत.


वाचा: तीर्थयात्रेदरम्यान भरकटलेले २७ यात्रेकरू सुखरुप परतणार

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस मिळाला होता. मग बेस्ट कर्मचाऱ्यांची अशा अवहेलना का? असा प्रश्न विचारला जात आहे. बेस्टच्या एकूण ४० हजार कर्मचाऱ्यांना बोनस देणार असल्याची माहिती महाव्यवस्थापकांनी बेस्ट समितीला दिली होती. याबाबत बेस्टचे व्यवस्थापक आणि पालिका आयुक्त यांच्यामध्ये काही वाटाघाटीही झाल्या होत्या. या वाटाघाटींनंतर पूर्ण विचार करुनच कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं कारण देत हा बोनस टाळण्यात आला. गेल्यावर्षीही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा असाच खेळ झाला होता. गेल्यावर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस तर दिला होता पण पुढील पगारामधून तो वळता करुन घेण्यात आला होता.


वाचा: भाजपा मला ‘गाय’ देईल का? ओवेसींचा सवाल

First Published on: November 12, 2018 8:38 PM
Exit mobile version