भीमा कोरेगाव प्रकरण : परेरा, भारद्वाज, गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज फेटाळला

भीमा कोरेगाव प्रकरण : परेरा, भारद्वाज, गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई उच्च न्यायालय

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले अरुण परेरा, सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस या तिघांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांचाही माओवाद्यांशी संबंध असल्याचा दावा राज्यसरकारने केला. राज्य सरकारचा दावा ग्राह्य मानत न्यायालयाने तीनही आरोपींना जामीन देण्यास नकार दर्शवला.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी अरुण परेरा, सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सुटका होण्यासाठी तीनही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावर आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी निर्णय दिला.

बंदी घालण्यात आलेल्या माओवाद्यांच्या सीपीआय (एम) या संघटनेशी अरुण परेरा, सुधा भारद्वाज आणि वर्नन गोन्साल्विस यांचा संबंध असल्याचा पुरावा पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. यासंदर्भातील रेकॉर्ड्स, पत्रे आदी पुरावे मिळाले असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. अॅड. अरुणा कामत पै यांनी सरकारच्या वतीने असा दावा केला आहे. सरकारचा दावा ग्राह्य मानत मुंबई उच्च न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

First Published on: October 15, 2019 1:51 PM
Exit mobile version