भिवंडीत पेपर गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जळून खाक

भिवंडीत पेपर गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जळून खाक

भिवंडीत पेपर गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जळून खाक

भिवंडी तालुक्याच्या गोदाम पट्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन या गोदाम संकुलातील पेपर गोदामांना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलातील इमारत क्र. २२९ मधील गोदाम क्रमांक ७ येथे सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण करून आग सर्वत्र पसरल्याने या आगीत तब्बल पाच गोदामांमध्ये साठवून ठेवलेले पेपर, प्लास्टिक साहित्य, रंगीत कागदी पॅकिंग यंत्र आणि कच्चा माल तसेच लगतच्या गोदामातील फरसाण बनविण्याच्या कारखान्यात देखील ही आग पसरून येथील सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; या घटनेची भिवंडी अग्निशमन दलास माहिती मिळताच दोन फायर गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी खाजगी टँकरच्या मदतीने पाणी उपलब्ध करून या आगीवर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवले आहे. मात्र, आग अजूनही धुमसत असून अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. गोदामांना लागलेली आग एवढी भयानक होती की या सर्व गोदामांचे पत्र्याचे छत लोखंडी अँगलसह जमिनीवर कोसळले आहे. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.


हेही वाचा – KEM मध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरला अर्वाच्च्य शिवीगाळ; Video व्हायरल!


First Published on: September 12, 2020 7:19 PM
Exit mobile version