‘तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सीन देंगे’; भाजपाकडून देश विभागणीचा प्रयत्न? – राऊत

‘तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सीन देंगे’; भाजपाकडून देश विभागणीचा प्रयत्न? – राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत

२८ ऑक्टोबर रोजी बिहार विधानसभेतील पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून अवघ्या देशाचं लक्ष बिहारच्या निवडणूकांकडे लागलं आहे. भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये आमची सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला टोला लगावला आहे. यावेळी जाहीरनाम्यातून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात असून, भाजपाने दिलेल्या आश्वासनावरून देशभरात गदारोळ सुरू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. जेव्हा शाळेत जायचो तेव्हा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा, अशी घोषणा होती. मात्र, आता तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सीन देंगे, अशी घोषणा दिली जात आहे. म्हणजे जे मत देणार त्यांनाच लस देणार, ही क्रूरता आहे. निर्घृणता आहे. बिहारमध्ये दुसऱ्या पक्षाला मत दिलं, तर त्यांना लस मिळणार नाही. मध्य प्रदेशातही हेच बोलल जात आहे. मग आता देशाची विभागणी करण्याची तयारी सुरू आहे का?,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांचा भाजपाला सवाल

यापूर्वी जातीधर्माच्या मुद्द्यावरून देशात विभागणी करण्याचा प्रयत्न झाला. आता भाजपला लसीच्या मुद्द्यावरून देशाचे विभाजन करण्याची तयारी सुरु आहे का? हे चांगले नाही, असा सवाल राऊत यांनी भाजपाला विचारला आहे. तसेच “नोकऱ्याचे आश्वासन समजू शकतो. अन्न, वस्त्र, निवारा हे समजू शकतो. आमचा आक्षेप लसीच्या मुद्याला आहे. लशीचा मुद्दा राजकारणासाठी आणि निवडणुकीसाठी वापरण्यात आला आहे. यामुळे पंतप्रधान मोदींची बदनामी होत आहे. मला हे वाटतेय, मोदीजींच्या प्रतिमेला ठेच पोहोवणारे वक्तव्य आहे,” असेही राऊत म्हणाले.


एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत करणार पक्षप्रवेश

First Published on: October 23, 2020 12:49 PM
Exit mobile version