घरमुंबईएकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत करणार पक्षप्रवेश

एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत करणार पक्षप्रवेश

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम

गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपमधून फुटून बाहेर पडलेले माजी विरोधी पक्षनेते, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

या सोहळ्यासाठी एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, मुलगी रोहिणी खडसे या खासगी हॅलिकॉप्टरने गुरूवारी मुंबईत दाखल झाले आहेत. खडसे यांचे जळगावमधील अनेक कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची जोरदार तयारी पक्षाने केली असून, ज्येष्ठ नेते प्रवेशावेळी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -