धोनीला बर्ड फ्लूचा फटका, कडकनाथ कोंबड्या करणार नष्ट

धोनीला बर्ड फ्लूचा फटका, कडकनाथ कोंबड्या करणार नष्ट

धोनीला बर्ड फ्लूचा फटका, कडकनाथ कोंबड्या करणार नष्ट

देशात धूमाकूळ घातलेल्या बर्ड फ्लूचा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला फटका बसला आहे. धोनीचा फार्म असलेल्या मध्यप्रदेशातील झाबुआमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्या मारण्याचा हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरु केल्या आहेत. यामध्ये धोनीने ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर दिली आहे. त्या पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्याही मारण्यात येणार आहेत. धोनीच्या फार्म मॅनेजरने एका शेतकऱ्याकडे २००० कोंबड्यांची ऑर्डर केली होती. मात्र बर्ड फ्लूमूळे स्थानिक प्रशासनाने कोंबड्या मारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे मध्यप्रदेशातील झाबुआमधील रुडीपाडा गावात हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिक प्रशासन ठोस उपाययोजना करत आहे.

धोनीने मध्यप्रदेशात फॉर्म हाऊस तयार केला असून या फॉर्म हाऊसमध्ये २००० हून जास्त कडकनाथ कोंबड्या ठेवण्यात येणार होत्या. यासाठी धोनीच्या फॉर्म मॅनेजरने मध्यप्रदेशातील विनोद मेधा या शेतकऱ्याला २००० कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर दिली होती. मॅनेजरने १५ डिसेंबर्यंत या कोंबड्यांची ऑर्डर द्यायला सांगितले होते. परंतु बर्ड फ्लूचा या शेतकऱ्याला फटका बसला आहे.

पाच दिवसांपूर्वी दिली ऑर्डर

धोनीच्या फॉर्म हाऊस मॅनेजरने तीन महिन्यांपूर्वी संपर्क करुन २००० कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर दिली होती. या कोंबड्यांची रांचीला पोहोचवायच्या आहेत. यासाठी धोनीच्या टीमने या शेतकऱ्याला पैसेही दिले आहेत. असे त्या शेतकरी विनोद मेधा यांनी दिले होती.

धोनीच्या फार्म हाऊस मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या मॅनेजरने काही दिवसांपूर्वी रांचीत कडकनाथ कोंबड्यांबद्दल चौकशी केली होती. मध्य प्रदेशात कोणाकडे मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबड्या मिळेल याबाबत माहिती काढली असता. शेतकरी विनोद मेधा यांचे नाव मध्य प्रदेशातील कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ कोंबडी प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या डॉ.चंदन कुमार यांनी सांगितले. यानंतर त्यांना ऑर्डर देण्यात आली होती.

धोनीने सेंबो फॉर्ममध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता या फार्महाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. धोनी ईजा फार्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे.

First Published on: January 13, 2021 1:09 PM
Exit mobile version