बेस्टच्या अर्थसंकल्पावर भाजपचा बहिष्कार

बेस्टच्या अर्थसंकल्पावर भाजपचा बहिष्कार

बेस्टच्या अर्थसंकल्पावर भाजपचा बहिष्कार

बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कोविडच्या काळात उत्तमपणे कामगिरी बजावली. परंतु त्यांना जोखीम भत्ता म्हणून ३०० रुपये दिले नाहीत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे चार्जशिट मागे घेतले जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता दिला जावा तसेच कर्मचाऱ्यांवरील चार्जशिट मागे घेतले जावेत अशी आग्रही मागणी भाजपच्या सदस्यांनी बेस्ट समितीत केली. परंतु प्रशासनाकडून याबाबत ठोस उत्तर दिले न गेल्यामुळे बेस्टच्या अर्थसंकल्पावर बहिष्कार घेत समितीच्या बैठकीत सभात्याग केला.

बेस्टच्या सन २०२१- २२च्या अर्थसंकल्पावर मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे.  या अर्थसंकल्पावर सर्व सदस्यांची भाषणे झाल्यानंतर महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांचे भाषण पार पडले. या वेळी महाव्यवस्थापकांच्या भाषणात बेस्ट कर्मचाऱ्यांना ३०० रुपये जोखीम भत्ता तसेच जे कर्मचारी कोविड काळात कामावर आले नाहीत त्याना उपक्रमाने चार्जशिट बजावलेली आहे. त्यामुळे त्यांची ग्रेड कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत कोणताही उल्लेख केला नाही. त्यामुळे भाजपचे प्रकाश गंगाधरे, गणेश खणकर, कागिनकर आणि राजेश हाटले आदी सदस्यांनी महाव्यवस्थापकांना फैलावर घेतले. बेस्टचा अर्थसंकल्प मंजूर करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

कोविड काळात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तसेच आपल्या रजा शिल्लक असताना जे कर्मचारी सेवेत दाखल होवू शकले नाही. त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यावरील चार्जशिट त्वरीत मागे घेतले जावे अशी आग्रही मागणी लावून धरली. पण महाव्यवस्थापकांनी सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखरे बेस्टच्या अर्थसंकल्पावर बहिष्कार घालून भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.


हेही वाचा – नगरसेवकांनी केली महिलांना ऑटो रिक्षाचे प्रशिक्षण देण्याची मागणी

First Published on: November 20, 2020 9:22 PM
Exit mobile version