महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपचा दावा; प्रभाकर शिंदेचे नाव जाहिर

महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपचा दावा; प्रभाकर शिंदेचे नाव जाहिर

मेट्रोसाठी बोरीवली-दहिसरमधील लिंकरोडवरील जलवाहिनी बाधित

महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपाने दावा केला असून याकरता प्रभाकर शिंदेच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजपाचे महापालिका गटनेते खासदार मनोज कोटक यांनी आज मुंबई महापालिकेच्या नगरसेवक गटाची कार्यकारिणी घोषित केली आहे. त्यानुसार विरोधी पक्ष नेते पदी प्रभाकर शिंदे, नगरसेवक प्रभाग क्र.१०६ यांचे नाव जाहिर केले आहे.

उपनेतेपदी उज्वला मोडक

दरम्यान, महापालिका गट भारतीय जनता पक्ष नेते पदी विनोद मिश्रा यांचे नाव जाहिर करण्यात आले आहे. तर उपनेतेपदी उज्वला मोडक आणि रिटा मकवाना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर महापालिका गट मुख्य प्रतोद पदी सुनिल यादव यांचे नाव पुढे केले जात आहे. त्यासोबतच महापालिका गटाचे प्रभारी म्हणून भालचंद्र शिरसाट यांचे नाव घोषित केले आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी नगरसेवक गटाची कामगिरी उंचावण्यासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी सक्षम विरोधी पक्षाची सकारात्मक भूमिका निभावण्यासाठी त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला जाहिर केली आहे.


हेही वाचा – जेव्हा राजेंनाही विधान भवनाच्या गेटवर उभं ठेवलं जातं…!


 

First Published on: February 27, 2020 3:03 PM
Exit mobile version