आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय; दहीहंडी उत्सवात फडणवीसांची तुफान फटकेबाजी

आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय;  दहीहंडी उत्सवात फडणवीसांची तुफान फटकेबाजी

राज्यात दहीहंडी उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय, विशेषत; मुंबईत अनेक राजकीय नेत्यांनी दहीहंडीची तब्बल दोन वर्षांची कसर भरून काढली आहे. मुंबईत अनेक भागांत राजकीय हंड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. यात विविध गोविंदा पथकही सहभागी होत आहेत. दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्र्याकडून मुंबईत दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळतेय. दरम्यान भाजप नेते प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथे आयोजित दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाषणातून तुफान फटकेबाजी केली.

फडणवीसांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत गोविंदांना खेळाडू असे संबोधले. तसेच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व सुविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता कस वाटतय मोकळं-मोकळं वाटतंय. छा-छान वाटतंय, अशी मिश्किल फटकेबाजी देखील केली. यावेळी फडणवीस यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलारही उपस्थित होते.

यावेळी फडणवीस पुढे म्हणाले की, आता आपले सरकार असून आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतोय, एकनाथ शिंदेंनी सांगितले की, आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. या खेळाडूंना सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, जखमी खेळाडूंच्या पाठीशी सरकार आहे, त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय, असं मिश्किल भाषण त्यांनी दिले. तसेच पुन्हा त्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी आपण फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु. असही म्हटले.


उद्धव ठाकरेंचे हिंदुविरोधी सरकार मराठी सण साजरा करायला विसरले; शेलारांचा टोला

First Published on: August 19, 2022 5:37 PM
Exit mobile version