‘त्या’ फोटोमुळे भाजप सापडलं अडचणीत!

‘त्या’ फोटोमुळे भाजप सापडलं अडचणीत!

'त्या' फोटोमुळे भाजप सापडलं अडचणीत

एकीकडे राज्य कोरोना संकटांशी सामना करते तर दुसरीकडे भाजपने राज्य सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन केले होते. यावेळी काळ्या फिती, झेंडे, काळ्या रिबन आणि फलक उंचावून काही दिवसांपुर्वी भाजपने ठाकरे सरकार विरोधात आंदोलन केले होते. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यात राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आले, याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपच्या वतीने घरच्या आंगणात उभे राहून सरकारविरोधात हे आंदोलन केले गेले होते. मात्र भाजपच्या या आंदोलनातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हयरल झाला.

या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या कपड्याने तोंड झाकलेली एक महिला मुस्लिम महिलांप्रमाणे बुरख्यामध्ये दिसतेय. मात्र या महिलेने जरी मुस्लिम महिलांप्रमाणे बुरखा परिधान केला असला तरी तिच्या कपाळावर टिकलीदेखील दिसतेय. या प्रकारामुळे भाजपमध्येही या फोटोबद्दल चर्चा सुरू आहे.

भाजपकडून केली जातेय सारवासारव

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा फोटो शेअर केला गेला असून तो मुस्लिम महिलेचा आहे, असे कुठेही म्हटलेले नाही, अशी सारवासारव याबाबत भाजपकडून केली जात आहे.

या मागणीसाठी भाजपने केले होते आंदोलन

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार हे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात अपयशी ठरलेले असून लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी प्रदेश भाजपने ‘मेरा आंगण,मेरा रणांगण’,असे आंदोलन केले असून या आंदोलनात अडीच लाख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचा दावा भाजपने केला. मात्र या सगळ्याच ‘त्या’फोटोंमुळे सोशल मीडियावर शिवसेना विरुद्ध भाजप असे वॉर सुरू आहे.

भाजपला केले जातेय लक्ष्य

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक वरील एका महिलेच्या फोटोमुळे चर्चेच्या वादळाला उधाण आले आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी, मुस्लिम वेषातील महिलेचा फोटो आहे, परंतु टिकली राहिलेली आहे, असे म्हणत भाजपला लक्ष्य केले. आंदोलनातील या वादग्रस्त फोटोबद्दल भाजपमध्ये उघडपणे कोणी बोलण्यास तयार नाहीत. फडणवीस यांच्याच फेसबुकवर हा फोटो असल्यामुळे तो नाकारता येत नाहीआणि बुरख्यातील महिलेच्या कपाळावरील टिकलीबाबत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावरून टीका करताना दिसताय.


पॅकेज म्हणजे रिकामा खोका

First Published on: May 25, 2020 10:48 AM
Exit mobile version