घरमहाराष्ट्रपॅकेज म्हणजे रिकामा खोका

पॅकेज म्हणजे रिकामा खोका

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्रावर टीका, लॉकडाऊन हळूहळू उठवणार

करोनाचे रुग्ण आणखी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून, गुणाकाराने करोना पसरणार आहे. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसंच हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल, असे सांगतानाच काही लोकांकडून पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, आतापर्यंत अनेक पॅकेजची घोषणा करण्यात आली. वरून छान दिसणारे पॅकेज उघडले की रिकामा खोका दिसतो. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र राजकारण करू नका, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दूरदर्शनवरून राज्यातील जनतेला संबोधित करत होते.

करोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागणार आहे. करोनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा, आपण जगायचं कसं हे करोनामुळे शिकलो आहे. लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही, आता लॉकडाऊन हा शब्द वापरू नका, हळूहळू आयुष्याची गाडी मार्गावर आणू, पुढील काही महिने मास्क घालावे लागतील, सतत हात धुवावे लागतील, एकमेकांपासून अंतर राखणे, रस्त्यावर न थुंकणे अशा गोष्टींचे पालन करावे लागणार आहे. लॉकडाऊन शब्द न वापरता आम्ही काय काय सुरू करणार याची यादी देऊ, या गोष्टी सुरळीत राहण्याची जबाबदारी सरकारपेक्षा लोकांची जास्त आहे. पुढील काही दिवस धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव घरातच साजरे करा, प्रत्येक धर्मातील लोकांनी आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.

- Advertisement -

पावसात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या, सर्दी, खोकला दिसल्यात तातडीने डॉक्टरकडे जाण्याची गरज असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. सर्दी, खोकला आणि ताप ही करोनाची लक्षणे असली तरी वास न येणे, थकवा जाणवणे, वास येत नसल्यास लागलीच डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळेत रुग्णांवर उपचार सुरू केल्यामुळे ते ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला. करोना रुग्णांच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली आहे. हा विषाणू गुणाकार करतो, त्याच्या गुणाकाराला कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही शिस्त पाळल्याने रुग्णांची संख्या आटोक्यात आली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारची सुरुवात झाली अन् करोनाचे संकट आले. करोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे. पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आले आहे. सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं आहे, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय केली आहे, राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा आहे; पण इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी रक्तदात्यांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -