उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे का? – किरीट सोमय्या

उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे का? – किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्वय नाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या जमिनीच्या व्यवहारांवरून आरोप करायला सुरुवात केली आहे. याआधी देखील पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांनी आरोप केले. आज पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. ‘माझ्याकडे एकूण २१ सातबारा उतारे आहेत. त्यावर रश्मी ठाकरे, मनीषा वायकर, अन्वय नाईक, अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांची नावं आहेत. असे किती व्यवहार या कुटुंबांमध्ये झाले आहेत? उद्धव ठाकरेंचा काय जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे का?’ असा सवाल किरीट सोमय्यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या परिवारांचा एकमेकांशी संबंध काय आहे? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. ‘सातबाऱ्यांमध्ये काही फॉरेस्टशीही संबंधित आहेत. असे किती जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराचे झाले आहेत? उद्धव ठाकरे परिवाराने अशा किती लोकांशी जमिनीचे व्यवहार केले आहेत? उद्धव ठाकरेंचा हा व्यवसाय आहे का? जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या असा त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? की ही फक्त गुंतवणूक आहे? अशा एकदोन लोकांसोबतच व्यवहार का झाले?’ असं सोमय्या म्हणाले.

‘जमिनीचे आर्थिक व्यवहार होतात आणि उद्धव ठाकरे, रवींद्र वायकर या व्यवहारांमध्ये आपापल्या पत्नींची नावं का देतात? उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराचा संबंध काय? हे दोन्ही परिवार एकत्र कसे येतात? रेवदंड्याच्या पुढे उद्धव ठाकरेंनी जमीन घेण्याचा संबंध काय? २१ सातबारा उतारे उद्धव ठाकरे, रश्मी उद्धव ठाकरे, अन्वय नाईक, अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांच्या व्यवहाराचे आहेत’, असा आरोप सोमय्यांनी यावेळी केला.

First Published on: November 12, 2020 3:25 PM
Exit mobile version