राज ठाकरेंना पाठिंबा; मशिदींवरील लाऊडस्पिकर विरोधात हायकोर्टात जाणार – मोहित कंबोज

राज ठाकरेंना पाठिंबा; मशिदींवरील लाऊडस्पिकर विरोधात हायकोर्टात जाणार – मोहित कंबोज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवरुन हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात बोलू नका असा फतवा काढला. मात्र, आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आमचा राज ठाकरे यांना मोळाव्यात केलेल्या विधानाला आमचा पांठिंबा असल्याचं म्हटलं. तसंच, मशिदींवरील लाऊडस्पिकर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचंही कंबोज यांनी म्हटलं.

”मुंबईतील लोक आता दिवसातील पाच वेळा हनुमान चालीसा ऐकणार यासंदर्भात आम्ही राज ठाकरेंचे अभिनंदन करतो. ही मागणी मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत होती आणि या विषयाला काल राज ठाकरेंनी दुजोरा दिला. मुंबईतल्या मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पिकर हे उतरवण्यात यावेत. तसंच, मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर कारवाई केली पाहिजे. तसंच देशातील इतर न्यायालयांनी मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पिकर उतरवण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत. त्यामुळं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी न्यायालयांचे आदेश लागू करा आणि तुम्ही सुरू केलेल्या ध्वनीप्रदुषणाविरोधातील मोहिमेअंतर्गत या मशिदींवरील लाऊडस्पिकर उतरवण्यात यावेत, अशी मागणी आहे”, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं .


हेही वाचा – राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलू नका, असदुद्दीन ओवैसींचा MIM कार्यकर्त्यांसाठी फतवा

First Published on: April 3, 2022 2:48 PM
Exit mobile version