पामेला ड्रग्ज प्रकरणी भाजप नेत्याला अटक, पोलिसांची धडक कारवाई

पामेला ड्रग्ज प्रकरणी भाजप नेत्याला अटक, पोलिसांची धडक कारवाई

पामेला ड्रग्ज प्रकरणी भाजप नेत्याला अटक, फरार होण्याआधीच पोलिसांची धडक कारवाई

भाजप युवा मोर्चाची कार्यकर्ता पामेला गोस्वामीला कोकेन आणि १० लाख रुपयांसह पोलिसांनी पकडले होते. पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात पालेला गोस्वामी आणि अन्य दोन जणांना अटक केली आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी पामेला गोस्वामीची पोलिसांनी चौकशी केली यामध्ये पामेला गोस्वामी यांनी भाजप नेते राकेश सिंह यांचे नाव घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजपा नेते राकेश सिंह यांच्यासह दोन मुलांनाही अटक केली आहे. भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी भाजप नेते राकेश सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन कारवाई केली आहे. राकेश सिंह यांची मुले फरार होणार असल्याची माहितीही पश्चिम बंगाल पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत पामेला गोस्वामी यांच्या बॅग आणि कारमध्ये लपवलेले कोकेन पोलिसांना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत राकेश सिंह यांचे नाव आले होते. अंमली पदार्थ प्रकरणात पश्चिम बंगाल पोलिसांनी भाजप नेते राकेश सिंह यांना नोटीस बजावत कोलकाताच्या पोलिस मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आपण कामानिमित्त दिल्लीला जात आहोत. असे राकेश सिंह यांनी म्हटले होते तसेच त्यांनी या प्रकरणाबाबत उच्च न्यायलयात धाव घेत पोलिसांच्या नोटीशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने राकेश सिंह यांची याचिका फेटाळली यानंतर पोलिसांनी राकेश सिंह यांच्या घरी छापा टाकला.

पोलिस घरी पोहचल्यानंतर राकेश सिंह यांच्या मुलांमध्ये आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. सिंह यांच्या मुलांनी पोलिसांना कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली होती. पोलिसांनी संबंधित कागदपत्रेही दाखवली आणि घराची झाडाझडती केली असे पोलिसांनी सांगितले आहे.

First Published on: February 24, 2021 11:45 AM
Exit mobile version