BJP Office Fire : नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयाला आग

BJP Office Fire : नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयाला आग

मुंबई : दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असलेल्या भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागली आहे. रविवारी दुपारी 4.35 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह आमदार प्रसाद लाड उपस्थित आहेत. (BJP Office Fire At Nariman Point In Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. भाजप कार्यालयात नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी वेल्डिंगचं काम सुरू असताना कार्यालयाच्या किचनमध्ये आग लागली. कार्यालयात कागदपत्रे आणि लाकडी फर्निचर असल्याने आगीने अधिकच पेट घेतला आणि त्यामुळे धुराचे लोटही पसरले.

हेही वाचा – Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा पाळा अन्यथा भरा भुर्दंड

दक्षिण मुंबईतील भाजपच्या कार्यालयात सोशल मीडियाचे काम सुरू होते. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचे काम सुरू होते. त्याचवेळी आग लागली. आग लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी हातातील काम टाकून तात्काळ बाहेर धाव घेतली. सर्व कर्मचारी एका क्षणात ऑफिसच्या बाहेर पडले. त्यामुळे आगीत कोणीही अडकले नाही. सध्यस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

विशेष म्हणजे भाजपच्या या कार्यालयात नेहमी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्ये उपस्थित असतात. मंत्री, आमदार, खासदारही याच कार्यालयात असतात. आमदार निवास आणि मंत्रालयाच्या परिसरातच हे कार्यालय असल्याने कार्यकर्त्यांना येथे येणे सोयीचं पडतं. त्यामुळे दिवसभर या कार्यालयात गर्दी असते. नेहमीच गजबलेले असलेल्या या कार्यालयात निवडणुकीमुळे अधिक गर्दी असते.


हेही वाचा – Maharashtra Highway : विरार-अलिबागसह महाराष्ट्रात तयार होणार आणखी 2 नवीन महामार्ग

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 21, 2024 5:29 PM
Exit mobile version