नितेश राणेंच्या विरोधात भाजपा-शिवसेना नेत्यांची फिल्डिंग

नितेश राणेंच्या विरोधात भाजपा-शिवसेना नेत्यांची फिल्डिंग

Notice to Nitesh Rane regarding attack on Santosh Parab in Kankavali

विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदार संघामध्ये भाजपकडून नितेश राणे निवडणूक लढवतील, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितल्यानंतर आता कोकणातील शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळेच कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शिवसेनेने आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने फिल्डींग लावायला सुरूवात केली आहे.

शिवसेनेकडून अरुण दुधवडकर यांचे नाव चर्चेत 

दरम्यान, कणकवली मतदारसंघामध्ये मागील चार वर्षांपासून सक्रिय झालेले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, शिवसेना या जागेसाठी भाजपकडे दावा करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपकडून संदेश पारकर, अतुल रावराणे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र जर राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राणेंनी सांगितल्या प्रमाणे नितेश राणे यांना भाजपने तिकीट दिले तर कोकणातील भाजप आणि शिवसेनेचे नेते एकत्र येऊन नितेश राणेंच्या विरोधात उमेदवार एक तगडा उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत गृहराज्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी देखील नितेश राणेंच्या विरोधात शिवसेना उमेदवार देईल, अशी प्रतिक्रीया दिली.

भाजपाने नितेश राणे यांना कणकवलीतून उमेदवारी दिली तर शिवसेना आपला उमेदवार उभा करेल आणि त्यांचा पराभव करेल. राणेंना व्यासपीठावर घेतले नाही याचा अर्थ भाजपा त्यांना प्रवेश देण्यास इच्छूक नाही.
– दिपक केसरकर, गृहराज्य मंत्री, पालकमंत्री

‘उमेदवारी जाहीर करण्याचा राणेंना अधिकार नाही’

सगळ्यात महत्त्वाचे राणेंनी नितेश राणे यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही तर तो दिल्लीतून ठरतो, असे सांगत कुणाला तिकीट द्यायची याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री ठरवत असतात त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्याचा राणेंना अधिकार नसल्याचे सांगत राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली. एवढेच नाही तर नारायण राणे यांनी पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाची भूमिका जाणून घ्यावी, अशी टीका देखील जठार यांनी यावेळी केली.

हेही वाचा –

आचारसंहितेमुळेच पालिका स्थायी समितीच्या ५ बैठकांमध्ये ३ हजार कोटींचे प्रस्ताव मंजुरी

First Published on: September 19, 2019 10:08 AM
Exit mobile version