BMC Budget : विद्यार्थ्यांना अत्याधुनिक टॅब पुरवणार ; 7 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद

BMC Budget : विद्यार्थ्यांना अत्याधुनिक टॅब पुरवणार ; 7 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद

BMC Budget : विद्यार्थ्यांना अत्याधुनिक टॅब पुरवणार ; 7 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 चे अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात येत आहे. या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सुरुवातीला शिक्षण समितीस अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेचे शिक्षण बजेट सादर करण्यात आले. शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. मुंबई महानगरपालिका शाळातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये अद्यावत अभ्यासक्रम अंतर्भूत असलेले टॅब पुरविण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. या अर्थसंकल्पात महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना टॅब पुरवठ्यासाठी 7 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅब वाटप योजनेत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांसाठी ‘या’ अंतर्भूत सुविधा उपलब्ध असणार

महापालिकेच्या शाळेत शिकत असणारे अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची असते. त्यांच्या पालकांची स्मार्ट फोन घेण्याची आर्थिक क्षमता नसते. याबाबत अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या. या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना  शिक्षणात मोठा खंड पडण्याची परिस्थिती निर्माण होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शालेय अभ्यासक्रमावर आधारित स्पॉटवेअर ई-लर्निंग साहित्यासह टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुरविण्यात येणाऱ्या टॅबमध्ये इंटरनेट, Wi-n, अद्ययावत कंटेट लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (LMS), अधिक क्षमतेची बॅटरी, अद्ययावत सॉप्टवेअर व टॅबचे कन्हर यासारख्या अनेक अंतर्भूत सुविधा उपलब्ध असणार आहेत.

मुंबई महापालिका शाळांमध्ये संगणकीय युगात डिजिटल व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देऊन भारताची भावी पिढी घडविण्याचा अर्थ ‘संकल्प’ पालिका शिक्षण खात्याने तयार केलाय. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून त्यांना या आधुनिक युगात संगणक, टॅब, प्रोजेक्टर, व्हर्च्युअल क्लासरूम आदींच्या माध्यमातून डिझिटल शिक्षण देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याने सन 2022- 23 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलीय.


हे ही वाचा –  केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित IGCSE व IB च्या शाळा उभारणार, 15 कोटींची तरतूद


 

First Published on: February 3, 2022 11:44 AM
Exit mobile version