घरमहाराष्ट्रBMC Budget 2022 : केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित IGCSE व IB च्या शाळा...

BMC Budget 2022 : केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित IGCSE व IB च्या शाळा उभारणार, 15 कोटींची तरतूद

Subscribe

मुंबई महापालिका शाळांमध्ये संगणकीय युगात डिजिटल व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देऊन भारताची भावी पिढी घडविण्याचा अर्थ 'संकल्प' पालिका शिक्षण खात्याने तयार केलाय. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून त्यांना या आधुनिक युगात संगणक, टॅब, प्रोजेक्टर, व्हर्च्युअल क्लासरूम आदींच्या माध्यमातून डिझिटल शिक्षण देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याने सन 2022- 23 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलीय.

मुंबईः मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला असून, त्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक तरतुदी करण्यात आल्यात. केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आयजीएसई शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका शाळांमध्ये संगणकीय युगात डिजिटल व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देऊन भारताची भावी पिढी घडविण्याचा अर्थ ‘संकल्प’ पालिका शिक्षण खात्याने तयार केलाय. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून त्यांना या आधुनिक युगात संगणक, टॅब, प्रोजेक्टर, व्हर्च्युअल क्लासरूम आदींच्या माध्यमातून डिझिटल शिक्षण देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याने वर्ष 2022- 23 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलीय.

- Advertisement -

पालिकेने विद्यार्थी व पालक यांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाण्याची ओढ लक्षात घेऊन पालिकेने नर्सरीपासून ते इयत्ता 12 पर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू केलेत. त्याचप्रमाणे मुंबईतील गरीब, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी कर्ज काढून परदेशात जाण्याची गरज भासू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा संकल्प पालिका शिक्षण खात्याने सोडला आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी खास शाळा व वर्ग सुरू करण्यात येत आहेत.

मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा वर्ष 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 370 कोटी 24 लाख रुपये आकारमान असलेला अर्थसंकल्प सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला. यामध्ये महसुली उत्पन्न आणि खर्च 2870.24 कोटी रुपये, तर भांडवली खर्च 500 कोटी रुपये दाखविण्यात आलेला आहे. या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळांमधून आधुनिक शिक्षण देण्यात येणार आहे. गणवेश, शिक्षण साहित्य, मोफत टॅब, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई. लायब्ररी, देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी टॅब देण्यात येणार असून, त्यासाठी 7 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

>>बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वोत्तम व सर्वांगीण शिक्षण देण्याकरिता महाराष्ट्र बोर्डासह सीबीएसई, आयसीएसई या बोर्डाचे शिक्षण देण्यात येत आहे.

>> केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. (International General Certificate of Secondary Education) अभ्यासक्रम जगातील शिक्षणाचे दर्जेदार माध्यम असून सदर बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु केल्याने मुंबईतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल.

>> तसेच आतंरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण महापालिकेमार्फत विद्यार्थ्यांना देण्याकरिता आय.बी (international Baccalaureate) या अग्रगण्य आतंरराष्ट्रीय शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात चांगले करियर घडविण्यास मदत होईल.

>>सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. (International General Certificate of Secondary Education) व आय. बी (International Baccalaureate) बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरु करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय तरतूद: ₹15 कोटी

शिक्षण खात्याचा यंदाचा अर्थसंकल्प 3370.24 कोटींचा आहे

महसुली खर्च 2870.24 कोटी रुपये

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -