मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग, केवळ ११ खड्डे शिल्लक असल्याचा पालिकेचा दावा

मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग, केवळ ११ खड्डे शिल्लक असल्याचा पालिकेचा दावा

मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग, केवळ ११ खड्डे शिल्लक असल्याचा पालिकेचा दावा

मुंबईत पाऊस सुरु झाल्यावर रस्त्यावर होणाऱ्या खड्ड्यांचा मुंबईकरांना प्रचंड सामना करावा लागतो. मुंबईतील खड्ड्यांची समस्या वर्षानुवर्षे सुरु आहे. मुंबईत सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी खड्डे मात्र जागोजागी दिसत आहेत. ११ जुलै संध्याकाळपर्यंत मुंबईत केवळ ११ खड्डे शिल्लक असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. (BMC claims that there are only 11 pits left in Mumbai)  एकूण ४१२ खड्ड्यांपैकी २४६ बुजवण्यात आलेत. तर १४१ खड्डे बुजवण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यातील केवळ ११ खड्डे बुजवण्याचे काम बाकी असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पश्चिम, चेंबूर,कुर्ला, मानखुर्द आणि मालाड परिसरात सर्वाधिक खड्डे आहेत. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाने मुंबईसह उपनगरात जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर अनेक भागात रस्त्यात खड्डे पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांना या खड्ड्यांपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ५० कोटींहून अधिक निधीची तरतूद केली जाते. मध्यवर्ती कार्यालय आणि प्रभाग कार्यालये अशा दोन्ही ठिकाणच्या खड्ड्यांच्या तक्रारीचे निरसन केले जात असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी वेबसाइट

आपल्या आजूबाजूच्या परिसरात खड्डे पडलेले दिसून आले तर त्याची तक्रार पालिकेच्या @mybmc या ट्विटर हँडलवर ट्विट करुन किंवा mcgm.gov.in या वेबसाइटवर आणि MYBMCpotholefixit या पोर्टलवर करु शकतो. त्याचप्रमाणे १८००२२१२९३ या टोल फ्री क्रमांकावर फोन करु शकता. खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी MCGM 24×7 हे अॅप देखील पालिकेने सुरु केले आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात

First Published on: July 12, 2021 11:51 AM
Exit mobile version