मध्य रेल्वेकडून ऐनवेळी असमर्थता; अखेर पालिकेने कल्व्हर्टची केली सफाई

मध्य रेल्वेकडून ऐनवेळी असमर्थता; अखेर पालिकेने कल्व्हर्टची केली सफाई

मध्य रेल्वेकडून ऐनवेळी असमर्थता; अखेर पालिकेने कल्व्हर्टची केली सफाई

मध्य रेल्वे प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर कल्व्हर्टच्या सफाईसाठी यंत्रणा नसल्याचे कारण देत असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे अखेर मुंबई महापालिकेवर मध्य रेल्वे मार्गावरील कल्व्हर्टची सफाई १५ दिवसांत युध्दपातळीवर करण्याची नामुष्की ओढवली. सुदैवाने वेळेत सफाई काम झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात मध्य रेल्वे मार्गावरून लोकल प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास रेल्वे मार्गावर पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील नाले, कल्व्हर्ट यांची पावसाळ्यापूर्वी सफाई वेळीच करणे आवश्यक असते. या नालेसफाईच्या कामासाठी मुंबई महापालिका रेल्वे प्रशासनाला दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपयांचा निधी देते. कारण की, मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन ही दोन वेगवेगळी प्राधिकरणे आहेत. रेल्वे हद्दीत जाऊन नाल्यांची सफाई करण्याचे अधिकार हे मुंबई महापालिकेला नाहीत. यामुळेच पालिका रेल्वे हद्दीतील नाल्यांची आणि कल्व्हर्ट यांची सफाई रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करवून घेते. मात्र पावसाळा तोंडावर आलेला असताना आणि नाले व कल्व्हर्ट यांची सफाई ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असताना मध्य रेल्वेने प्रशासनाने मे महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात आपल्याकडे कल्व्हर्टची सफाई करण्यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे कारण देत हात वर केले. तसेच, रेल्वे हद्दीतील १८ पैकी १५ कल्व्हर्टची सफाई पालिकेने यंत्रणा वापरून करावी, अशी विनंती केली. त्यामुळे नाईलाजाने मुंबई महापालिकेला मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते मुलुंड दरम्यानच्या १५ कल्व्हर्टमधील गाळ १५ दिवसांत युद्धपातळीवर काढून साफसफाई करावी लागली.

जर पालिकेने वेळीच यंत्रणा वापरून या कल्व्हर्टची सफाई केली नसती तर यंदाच्या पावसाळयात कल्व्हर्ट गाळाने व कचरा, पाण्याने तुंबून रेल्वे मार्गात ठिकठिकाणी पाणीसाचून रेल्वे वाहतूक सेवा बंद पडण्याची दाट शक्यता होती. सुदैवाने पालिकेने ही सफाई वेळेत केल्याने यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे सेवा निर्विघ्नपणे सुरू राहून लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र मध्य रेल्वेने जेथे मशनरी जाऊ शकत नव्हती अशा फक्त तीन कल्व्हर्टची सफाई मनुष्यबळाचा वापर करून केली आहे.

मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गावर ११६ कल्व्हर्ट

पालिका दरवर्षी कंत्राटदारामार्फत करते. त्यासाठी पालिका किमान १०० – १५० कोटी रुपये खर्च करते. मात्र मुंबईतील मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गातील लहान, मोठे नाले, ११६ कल्व्हर्ट यांची सफाई करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असते. मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे ११६ कल्व्हर्ट आहेत. त्यापैकी पश्चिम रेल्वे मार्गावर ४१, मध्य रेल्वे मार्गावर ५३ आणि हार्बर रेल्वे मार्गावर २२ कल्व्हर्ट आहेत. यातील बहुतांश खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत. नाल्यांच्या खुल्या प्रवाह मार्गातील गाळ काढणे तुलनेने सोपे असते तर बंदिस्त प्रवाह मार्गातील गाळ काढून स्वच्छ्ता करणे आव्हानात्मक असते.

मात्र महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता एल.कमलापूरकर, उपप्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे, सहाय्यक अभियंता राजेश यादव आणि सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी युद्धपातळीवर हे काम पूर्ण केले आहे

First Published on: June 6, 2021 3:16 PM
Exit mobile version