मुंबई महापालिका आयुक्त म्हणाले, लोकल सर्वसामान्यांसाठीही सुरु करणार पण…

मुंबई महापालिका आयुक्त म्हणाले, लोकल सर्वसामान्यांसाठीही सुरु करणार पण…

आजपासून १८ वर्षांखालील मुले करू शकणार लोकलने प्रवास

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी संपूर्ण मुंबई अनलॉक करायला तयार असल्याचे सांगितले आहे. मुंबईची लाईफलाईन कोरोनाकाळात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू आहे, मात्र मुंबई लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरु केली जावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी मुंबई लोकल पुन्हा सुरू करण्याकरता महत्त्वाची अट स्पष्ट केली आहे.

मुंबई अनलॉक करण्याबरोरबच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यास आम्ही लॉकडाऊन कधीही उठवू शकतो, असे चहल यांनी सांगितले. तसेच मुंबईतील कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना तो आकडा नियंत्रणात आला तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्यांसाठीही सुरु करणार, असेही महत्त्वपूर्ण वक्तव्य महापालिका आयुक्तांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचा रुग्णवाढीचा दर हा केवळ एक टक्का आहे. पण एमएमआर क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईप्रमाणेच एमएमआरची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यास रुग्णवाढीचा दर ६४ दिवसांवर येईल. त्यामुळे आपण लोकल ट्रेनही सुरू शकतो. तर गेल्या दोन महिन्यात मुंबईत दर दिवशी सरासरी १७०० पेक्षा रुग्ण वाढलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मुंबई अनलॉक करू शकतो. मात्र मुंबईशेजारील एमएमआर क्षेत्रात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ते प्रमाण कमी झालं पाहिजे, असे आयुक्त म्हणाले.

दरम्यान, मुंबई लोकल येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. केंद्र सरकार याबाबत विचार करेल, हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही, असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केले होते.


रोज ५ वेळा म्हणा, हनुमान चालीसा; कोरोना होईल बरा- साध्वी प्रज्ञा ठाकूर

First Published on: July 26, 2020 12:37 PM
Exit mobile version