मुंबईतील शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद

मुंबईतील शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद

मुंबईतील शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील शाळा कधी सुरू होतील याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णय पालिकेने घेतला आहे.

राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेण्याता आला होता. त्यानुसार २३ नोव्हेंबरला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मुंबईतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबईतील कोरोनाची रूग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र रूग्णसंख्या वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे, नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील शाळा ४ जानेवारीपासून सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र मुंबईतील शाळा कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे. ३१ डिसेंबरपर्यत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता पालिकेने १५ जानेवारीपर्यंत मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर लक्षप्रणाली

First Published on: December 29, 2020 7:30 PM
Exit mobile version