BMC Election : भाजपचं मिशन ‘मुंबई’; फडणवीसांच्या नेतृत्त्वात आज महत्त्वाची बैठक

BMC Election : भाजपचं मिशन ‘मुंबई’; फडणवीसांच्या नेतृत्त्वात आज महत्त्वाची बैठक

विविध शुल्कात दरवर्षी ५% दरवाढ करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचं मुंबई मिशन सुरू झालं असून आज मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याची शक्यता आहे.

भाजपची आज दुपारनंतर बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, खासदार मनोज कोटक आणि पालिकेतील काही नगरसेवक आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की अन्य कुणाला सोबत घ्यायचं यावरही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

गेली कित्येक वर्षे एकत्र असलेली युती २०१९ मध्ये तुटली. शिवसेनेने युतीतून बाहेर पडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं. याची सल भाजपला असून महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला हरवण्याचा पण भाजपने घेतला आहे. यासाठी भाजपने तयारी देखील सुरू केली. पालिकेच्या कामावरून भाजप सातत्याने टीका करत आहे. त्यामुळे येणारीं पालिका निवडणूक शिवसेनेला जड जाणार आहे.

 

First Published on: June 9, 2021 12:31 PM
Exit mobile version