मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना १५,००० रुपयांचा बोनस!

मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना १५,००० रुपयांचा बोनस!

मुंबई पालिका निवडणूक आरक्षणाविरोधात फक्त ३ हरकती

आरोग्य सेविकांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीप्रकरणी आणि आरोग्य सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, २९ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुख्य कार्यालयावर आंदोलनाचा पवित्रा घेतला. आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या अमानवी वागणूकीबाबत यावेळी निषेध करण्यात आला. याशिवाय, मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. असं जरी असलं तरी प्रत्यक्षात मात्र पालिका कर्मचारी आणि आरोग्य सेविकांनी या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे.

महापालिकेकडून बोनस जाहीर

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, शिक्षक, तंत्रज्ञ, अभियंते, कंत्राटी कामगार आदींना बोनस देण्यालाठी १५६.७ कोटी रुपयांची तरतूद २०१७-१८ साठी करण्यात आली आहे. त्यानुसार, ४० हजार रुपये वा एकूण वेतनाच्या २० टक्के इतका बोनस देण्याची मागणी समन्वय समितीची होती. ४० हजार रुपये बोनसची मागणी केली असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ५०० रुपये वाढवून दिले असल्याची तीव्र प्रतिक्रिया पालिका कर्मचारी व्यक्त करत आहेत.

२२ हजारांच्या बोनसची अपेक्षा

लहान- लहान महापालिकांमध्ये ही २२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्यानुसार, महापालिका कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपये बोनस देणे आवश्यक होते. तसंच, आरोग्य सेविकांनाही दहा हजार रुपये बोनस देणं गरजेचं आहे. त्यामुळे, पालिका कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या माध्यमातून आपली मागणी महापौरांकडे मांडली असल्याचे मुंबई मनपा कामगार कर्मचारी समन्वय समितीचे सरचिटणीस अॅड. पकाश देवदास यांनी सांगितले आहे. कमीत कमी २२ हजार रुपये तरी बोनस सहज मिळाला असता, असं म्हणत आपली नाराजी समन्वय समितने व्यक्त केली आहे.

First Published on: October 29, 2018 8:48 PM
Exit mobile version