गणेशोत्सवाला महापालिकेची परवानगी पण, अटींचे पालन करणं बंधनकारक

गणेशोत्सवाला महापालिकेची परवानगी पण, अटींचे पालन करणं बंधनकारक

श्री गणरायांच्या आगमनाच्या चाहुलीने प्रत्येक भक्तांचे मन बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी व्याकूळ झाले आहे. मात्र, यंदा बाप्पांचा उत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन सरकारने केलेले असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात ना भाविकांना हार अर्पण करता येणार ना फुले. ना भाविकांच्या हाती पडणार बाप्पांचा प्रसाद. गणेशोत्सवात महापालिकेने मंडळांना परवानगी देताना अशाप्रकारच्या अटी घालून उत्सव साजरा करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरुवात केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्यावतीने मंडप उभारण्यास परवानगी दिली जाते. या मंडळांच्या मंडपांना परवानगी देताना महापालिकेने जो प्रतिज्ञापत्रकाचा मसुदा बनवला आहे, त्यामध्ये त्यांनी यावर्षी विशेष बाब म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले व हार अर्पण करणे आदी गोष्टींना प्रतिबंध करण्याच्या अटीचा समावेश करण्यात आला आहे. गणेश मंडपांच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर जे फुले, हार, प्रसाद विक्रीचे तात्पुरते स्टॉल व टेबल लावले जातात, त्यांना वर्षी स्टॉल व दुकाने लावू दिली जाणार नाही.

मात्र, एकाबाजुला भाविकांना हार व फुले अर्पण करण्यास प्रतिबंध आणतानाच यंदा मंडळांनीही हार, फुले व प्लास्टिक इत्यादींचा कमीत कमी वापर करून कमीत कमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव साजरा करताना मंडप परिसरात सामाजिक नियमांचे पालन करणे आवश्यक असून मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व कार्यकर्ता यांनी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. याशिवाय मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत याची काळजी घेण्याचाही सूचना केल्या आहेत. मंडपातील दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून भाविकांना गणेशमूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन व भेटीची परवानगी दिली जावू नये,अशाही सूचना केल्या आहेत.


गणेशोत्सवासाठी मूर्तींची उंची ठरली!; सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

First Published on: July 12, 2020 5:19 PM
Exit mobile version