गृहनिर्माण संस्था, कार्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक सुचना

गृहनिर्माण संस्था, कार्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक सुचना

गृहनिर्माण संस्था, कार्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक सुचना

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढीबरोबरचं लसीकरण मोहिमही वेगाने राबवली जात आहे. मुंबईतील खासगी रुग्णालय, सरकारी रुग्णालय, आणि पालिकेने सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांमध्येच नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु आता मुंबईतील खासगी सोसायट्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांचा आवारात लसीकरण मोहिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र या रुग्णालयांने काही मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शन सुचना लसीकरणादरम्यान प्रत्येक रुग्णालायांना पाळणे बंधनकारक असणार आहे.

पालिकेच्या मार्दर्शक सुचना

१) गृहनिर्माण संस्था अथवा कार्यालयांचा आवारात खासगी रुग्णालयांनी सुरु केलेल्या लसीकरण केंद्रात सरकारने ठरविलेल्या किंमतीत प्रत्येकाला लस दिला जाणार आहे.

२) काही गृहनिर्माण संस्था यापूर्वीच बीएमसीशी चर्चा करीत आहेत, तर काही इतर त्यांच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत.

३) मुंबईतील प्रत्येक गृहनिर्माण संस्था, औद्योगिक संकुले, बँका आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या कोणत्याही खाजगी रुग्णालय / कोरोना केंद्रांशी करार करत आपल्या आवारात लसीकरण केंद्रे सुरु करु शकतात. अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.

४) दरम्यान सध्या पालिकेने ७५ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. परंतु या लसीकरण केंद्राना पालिकेने ठरवून दिलेल्या लसीकरणादरम्यानचा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

५) परंतु ज्यांना मोफत लस हवी त्यांना पालिकेने सुरु केलेल्या २२७ नवीन केंद्रांवर मोफत लस मिळू शकेल. ही लसीकरण केंद्रे लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर विनामूल्य लस देणार आहेत.

६) दरम्यान मुंबईसारख्या मोठ्या शहरात लोकसंख्या सर्वाधिक असल्याने पालिनेने खासगी रुग्णांलयांमार्फत आणि लसीकरण केंद्रांमार्फत लसीकरण मोहिम वाढवणे गरजेचे आहे.

७) मुंबईला कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका कोरोना संसर्ग वाढेल यासाठी सुरक्षित उपाययोजना आखत खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांना परवानगी देत आहे. येत्या काही दिवसात शहरात खासगी लसीकरण केंद्रे वाढवण्यात येतील व त्यांना जलद आणि सहज परवानग्या देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

८) नोंदणीकृत खासगी कोरोना लसीकरण केंद्र किंवा रुग्णालये गृहनिर्माण संस्था व खासगी कार्यालयांचा ठिकाणी लसीचे व्यवस्थापन करू शकतात. परंतु यात समन्वय साधण्यासाठी एका अनुभवी आरोग्य अधिकाऱ्याला नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाईल.

९) हे नोडल अधिकारी कार्यालयांमधील किंवा गृहनिर्माण संस्थांमधील लसीकरणाच्या सर्व बाबींवर देखरेख व सुलभता राखण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी, साठा, यावेळी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करेल.

१०) याशिवाय लसीकरणापूर्वी लाभार्थ्यांना Co-WIN portal वर नोंदणी करणे बंधनकारक असेल. दरम्यान हे नोडल अधिकारी सर्व नागरिकांची ऑनलाईन नोंदणी सुनिश्चित करतील. कार्यस्थळाच्या बाबतीत, लसीकरण केंद्रांवर नोंदणी केवळ कामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांना उपलब्ध असेल. (लसीकरणापूर्वी कर्मचार्‍यांच्या कुटूंबातील सदस्यांची Co-WIN portal वर नोंदणी असणे आवश्यक आहे). एका खासगी लसीकरण केंद्रामार्फत शहरातील इतर कार्यालये किंवा गृहनिर्माण सोसायट्यांशी संबंध असू शकतात. अशा प्रकारच्या खासगी लसीकरण केंद्रांना जोडलेली कार्यालये आणि गृहनिर्माण संस्थेची माहिती स्थानिक आरोग्य प्राधिकरण (संबंधित प्रभाग एमओएच) आणि ईपीआय यांना दिली जाईल.

११) या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि कर्यालये खासगी लसीकरण उपकेंद्र म्हणून काम करतील. याठिकाणीही तीन वर्गीकरण खोल्या असणे आवश्य़क आहेत. तसेच कोव्हीन पोर्टलप्रमाणे या खासगी गृहनिर्माण संस्था आणि कार्यालयांमध्ये पीसीव्हीसी म्हणून एक नोंदणी असेल.


 

First Published on: May 11, 2021 10:02 AM
Exit mobile version