मुंबईत ५२८ नागरिकांमध्ये करोना सदृश्य लक्षणे; घरीच थांबण्याचे आदेश

मुंबईत ५२८ नागरिकांमध्ये करोना सदृश्य लक्षणे; घरीच थांबण्याचे आदेश

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई महानगरपालिकेने करोना सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यासाठी १० हजार २७ सोसायटीची पाहणी केली, तर २५४ घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये ५२८ लोकांमध्ये करोना सदृश्य लक्षणे आढळली असून त्यांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या रुग्णांना ताप, खोकला, सर्दी असे आजार दिसून आले आहेत.

करोना सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यलयांमध्ये १०६७ पथके स्थापन करण्यात आली आहे. यात आरोग्य सेविकांसह आरोग्य विभागचे अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या तपासणीत अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम या के- पश्चिम विभागात सर्वाधिक १०९४ सोसायट्यांच्या पाहणी करण्यात आली. याच विभागात सर्वाधिक ५६ रुग्ण हे ताप, सर्दी, खोकला यांचे आढळून आले. त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.

First Published on: March 16, 2020 10:15 AM
Exit mobile version