‘वरळी’ला मिळाला मुंबईतील स्वच्छ वॉर्ड पुरस्कार

‘वरळी’ला मिळाला मुंबईतील स्वच्छ वॉर्ड पुरस्कार

मेट्रोसाठी बोरीवली-दहिसरमधील लिंकरोडवरील जलवाहिनी बाधित

मुंबई महापालिकेने घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पालिकेच्या वरळी विभागाने मुंबईतील स्वच्छ वॉर्डचा पुरस्कार पटकावला आहे. तर वरळीतीलच डॉ. बी. एच. खरुडे महापालिका मंडईने सर्वात स्वच्छ मंडईचा मान पटकावला आहे. त्यामुळे वरीळीने स्वच्छतेत दुहेरी मुकुट पटकावले आहे. मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये पालिका वॉर्ड, शाळा, हॉटेल्स, मंडई, रुग्णालये या ११ गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. वरळीतील ‘एनएससीआय’मध्ये नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे वितरण आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

हे आहेत पुरस्कार विजेते

दरम्यान, स्वच्छ गृहनिर्माण संस्थेचा मान फ्रॅन्जीपानी सहकारी गृहनिर्माण संस्था, कुर्ला यांनी पटकावला आहे. तर स्वच्छ हॉटेलचा मान रेनसान्स मुंबई कन्हेन्सन सेंटर, भांडुप यांना मिळाला आहे. तर स्वच्छ सार्वाजनिक रुगणालय म्हणून सेंट जॉर्जेस समूह रुग्णालय, फोर्टने पुरस्कार मिळवला आहे. तर खासगी रुग्णालयात पी. डी. हिंदुजा, माहिम यांनी पुरस्कार पटकावला आहे. तर स्वच्छ पालिका शाळांमध्ये आयईएस हर्णे गुरुजी विद्यालयाने मान मिळवला असून खासगी शाळांमध्ये विट्टी इंटरनॅशनल शाळा, गोरेगाव यांनी पुरस्कार पटकावला आहे. तर सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्थामध्ये माऊली मिराई महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, दहिसर आणि स्वच्छ सामुदायिक शौचालय – सार्वजनिक शौचालय – प्रथा सामाजिक संस्था, घाटकोपर यांनी पुरस्कार मिळवला आहे.

वरळी विभागाला पुरस्कार मिळण्याचे सर्व श्रेय जी – दक्षिण विभागाच्या सर्व कर्मचारी आणि विभागाचे अधिकारी यांचे आहे. स्वच्छतेचे काम हे केवळ ८ तासांचे काम आहे, असे न मानता वरळीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने मनापासून झटून काम केले केले आहे. त्यासोबतच प्रत्येक वरळीकरांचे देखील आभार मानले पाहिजे, कारण त्याच्या सहकार्यामुळेच हा बहुमान वरळीला मिळाला आहे.  – किशोरी पेडणेकर, महापौर


हेही वाचा – सुधीर मुनगंटीवारांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार बंगल्याविना


 

First Published on: January 20, 2020 10:47 AM
Exit mobile version