वेबसिरिजमध्ये अभिनेत्रीला ‘बोल्ड’ सीन करायला लावला, अन्‌ घडलं असं…

वेबसिरिजमध्ये अभिनेत्रीला ‘बोल्ड’ सीन करायला लावला, अन्‌ घडलं असं…

सेन्सॉर बोर्डाचे बंधन नसल्यामुळे वेबसिरीज बनवणार्‍या प्रोडक्शन कंपन्यांनी देशात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बोल्डसीनमुळे हिट जाणार्‍या वेबसिरीजने अश्लीलतेचा कळस गाठला असला तरी या वेबसिरीजमुळे मॉडेलिंग क्षेत्रातील अनेकांना रोजगार मिळाल्याने त्यांचे अच्छे दिन आले आहेत. मात्र या वेबसिरीजचे दिग्दर्शक आणि निर्माते पैसा कमवण्यासाठी मॉडेल आणि हिंदी मालिकांमधील नट्याकडून कराराच्या नावाखाली बळजबरीने बोल्डसीन करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हिंदी मालिकेतील एका नटीने वेबसिरीजच्या दिग्दर्शकासह दोन जणांविरुद्ध अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डी.एन. नगर पोलिसांनी दिग्दर्शक आणि एका महिलेविरोधात विनयभंग तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अंधेरी पश्चिम येथे राहणार्‍या एका हिंदी मालिकेतील नटीने एका कॉमेडी वेबसिरीजमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी करार केला होता. कॉमेडी वेबसिरीजसाठी तिने हा करार केला होता. या वेबसिरीजचे शूटिंग गेल्या काही दिवसांपासून मालाड मढ येथील एका बंगल्यात सुरू होते. या नटीने वेबसिरीजमध्ये कुठलेही बोल्डसीन नसल्याचे दिगदर्शकाकडून कबूल करून घेतले होते. मात्र वेळोवेळी दिग्दर्शकाने तिला करारनाम्याची भीती दाखवत तिच्याकडून बळजबरीने बोल्डसीन करून घेतले होते.

या वेबसिरीजमध्ये दोन महिलांचे अनैतिक संबंध दाखवण्यात आले असून त्यात या नटीला दिग्दर्शकाने बेडसीन करण्यास भाग पाडले होते. परंतु तिने हा सीन करण्यास नकार देताच तिला धमकी देऊन तिच्याकडून बेडसीन करून घेतला. त्यानंतर या नटीने मी वेबसिरीज सोडत असल्याचे सांगून तिथून निघून गेली.

अखेर या नटीने अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात दिग्दर्शक आणि एका महिलेविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. डी. एन. नगर पोलिसांनी या वेबसिरीजचा दिग्दर्शक आणि एका महिलेविरुद्ध विनयभंग आणि धमकीचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार मालाड येथील मढ येथे घडल्यामुळे हा गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात वर्ग कण्यात येणार असल्याची माहिती डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गनमे यांनी दिली.

First Published on: June 21, 2019 4:25 AM
Exit mobile version