अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्किटेक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आयपीसी कलम ३०६ अंतर्गत अर्णब गोस्वीमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी मुंबईतील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या घरात दीड तास हुज्जत घातली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनौत हिने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अजून तुम्ही किती जणाचे घरं तोडणार आहात? किती जणांचे गळे दाबणार आहात?’ अशा थेट सवाल कंगनाने ठाकरे सरकारला केला आहे.

काय म्हणाली कंगना?

कंगना म्हणाली की, ‘मला महाराष्ट्र सरकार असे विचारावस वाटते की, तुम्ही आज अर्णब गोस्वामी यांच्या घरी जाऊन त्यांना मारले आहे, त्यांचे केस खेचले, त्यांना धक्काबुक्की केली. तुम्ही अशी किती घरं तोडणार आहात? किती जणांचे गळे दाबाल? किती केस खेचाल? किती जणांचे आवाज बंद कराल? ‘

पुढे कंगना सोनियसेनेचा उल्लेख करत म्हणाली की, ‘सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. किती जणांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तरीही इतर आवाज उठतील. पेंग्विन म्हटल्यावर राग का येतो? पेंग्विनसारखे दिसतात तर म्हणणार ना. वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना. तुम्हाला सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का? तुम्ही सोनियासेना आहात.’


हेही वाचा- पोलिसांनी सासू-सासरे, मुलगा आणि पत्नीला केली धक्काबुक्की, अर्णब गोस्वामींचा आरोप


 

First Published on: November 4, 2020 10:22 AM
Exit mobile version