आज ‘स्कूल बस’ राहणार बंद

आज ‘स्कूल बस’ राहणार बंद

दुग्ध शेतकऱ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनामुळे पहिल्यापासून हैरान असलेल्या मुंबईकरांच्या त्रासात भर पडली आहे. ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेस (एआईएमटीसी) व्दारे संप पूकारण्यात आला आहे. या संपात महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनही सहभाग घेणार असल्यामुळे आज शहरात स्कूल बस बंद रहाणार आहेत. या आंदोलनामुळे प्रतिदिन दोन हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पेट्रोलवर वस्तू व सेवा कर (GST) लागू करा ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे.

स्कूल बस असोसिएशनतर्फे गुरुवारी केलेल्या घोषणेप्रमाणे मुलांना शाळेत सोडणारे सर्व ऑपरेटर या आंदोलनात सामिल होतील. पेट्रोलच्या मुद्यामुळे या चालकांनी एक दिवसीय संप पुकारला आहे. पेट्रोलची वाढती किंमत नियंत्रणात आणण्या बरोबरच पुढील सहा महिन्या पर्यंत पेट्रोलचे दरात स्थिरता, स्कूल बस वरील एक्साइज ड्युटी बंद करणे, शाळकरी वाहनांना टोल मुक्त करणे, बसेससाठी विम्याची रक्कम कमी करणे, फिटनेस प्रक्रियेच्या अटी शीतील कराव्यात आणि वाहतूक पोलिसांकडून केले जाणारे निरीक्षण बंद करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत.

या व्यतिरिक्त ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने देशभरात अनिश्चित चक्काजाम आंदोलन अनिश्चित वेळेपर्यंत सुरूच राहणार आहे. या आंदोलना पासून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळण्यात येणार आहे. एआयएमटीसी चे चेअरमॅन बाळ मिल्कित सिंह यांनी सांगितले की,”केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी भेट घेण्यात आली. या बैठकी दरम्यान आम्ही आमच्या मागण्या त्यांना सांगितल्या. त्यांनी यासाठी वेळ मागितला आहे. अगोदरच आम्ही या वर विचार कण्यासाठी खूप वेळ दिला आहे. म्हणूनच आजपासून या आंदोलनाची सुरुवात आम्ही करत आहोत.”

First Published on: July 19, 2018 11:45 PM
Exit mobile version