गोवंडीत पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला; दोन गंभीर जखमी

गोवंडीत पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला; दोन गंभीर जखमी

गोवंडीत पुलाचा सांगडा कोसळला; दोन गंभीर जखमी

मुंबईतील घाटकोपर, मानखुर्द, लिंक रोडवर ट्रकचा धक्का लागल्यामुळे मध्यरात्री पुलाचा सांगाडा कोसळला. गोवंडी येथील बैंगनवाडी सिग्नल दरम्यान ही घटना घडली आहे. पुलाच्या सांगाड्याखाली चार गाड्यांचा चुराडा झाला असून या अपघतात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र या घटनेमुळे गोवंडीतील बैंगनवाडी पासून पुढची वाहतूक मार्ग ठप्प झाली होती.

या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, देवनार पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने हा पुलाचा सांगाडा काढला. त्यामुळे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील सुरळीत सुरू झाली.

नक्की काय घडले?

काल मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पालिकेच्या पादचारी पुलाला एक ट्रकचा धक्का लागल्याने पुलाचा सांगाडा कोसळला. त्यामुळे हा सांगाडा थेट घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर कोसळला. या पुलाच्या सांगाड्याखाली चार गाड्यांचा चुराडा झाला आहे. तसंच या अपघातामुळे ट्रक चालक आणि एका इसमचा गंभीर जखमी झाला आहे.


हेही वाचा – आजपासून मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ट्रॅकवर


 

First Published on: January 30, 2020 7:52 AM
Exit mobile version