घरमुंबईआजपासून मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ट्रॅकवर

आजपासून मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ट्रॅकवर

Subscribe

मोटर वुमेन मनिषा म्हस्के करणार सारथ्य

मध्य रेल्वेच्या इतिहासात ट्रान्स हार्बर मार्गावर आजपासून पहिली एसी लोकल ठाणे ते वाशी-पनवेल धावणार आहे. विशेष म्हणजे लोकलच्या पहिल्या फेरीचे सारथ्य महिला मोटर वूमेन मनिषा म्हस्के करणार आहेत. त्याचबरोबर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक प्रवासी सोयी-सुविधांचे लोकापर्ण देखील करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरून गुरुवारी एसी लोकल आणि विविध सुविधांचे लोकापर्ण देखील करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल हे व्हिडीओ लिंकद्वारे एसी लोकलला दिल्लीमधून हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्यानंतर पनवेल स्थानकातून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एसी लोकल ठाण्यासाठी रवाना करण्यात येणार आहे.तर शुक्रवार 31 जानेवारीपासून ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलच्या नियमित फेर्‍या होणार असून दिवसाला 16 फेर्‍या होणार आहेत.त्याचबरोबर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते मुंबईकरांसाठी नवीन पादचारी पूल,शौचालय,वाय-फाय इत्यादी सेवा सुरू करण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकातील नवीन पादचारी पुलाचे उद्घाटन होणार आहेत.

- Advertisement -

एसी लोकलचे वेळापत्रक

मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. शुक्रवार ३१ जानेवारी पासून एसी लोकलच्या अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी ८-८ अशा एकूण १६ फेर्‍या होणार आहेत. सोमवार ते शुक्रवार दरम्यान एसी लोकल धावणार आहे. शनिवारी एसी लोकलऐवजी साधी लोकल चालविण्यात येणार आहे. तर रविवारी एसी लोकलच्या फेर्‍या रद्द असणार आहेत. पनवेल स्थानकातून ठाणे स्थानकाकरिता एसी लोकलची पहिली फेरी सकाळी ५.४४ वाजता सुटणार आहे.

एसी लोकलचे वेळापत्रक
ट्रेन सुटणार पोहोचणार
पनवेल-ठाणे स.५.४४वा स.६.३६वा
ठाणे-नेरुळ स .६.४६वा स.७.१६वा
नेरुळ-ठाणे स.७.२९वा स.८.०० वा
ठाणे-वाशी स.०८.०८वा स.८.३७वा
वाशी-ठाणे स.८.४५वा स.९.१४वा
ठाणे-नेरुळ स.९.१९वा स.९.४९वा
नेरुळ-ठाणे स.९.५७वा स.१०.२७वा
ठाणे-बेलापुर स.१०.४०वा स.११.१९वा
पनवेल-ठाणे दु.४.१४वा संध्या.५.०८वा
ठाणे- नेरुळ संध्या ५.१६वा संध्या.५.४६वा
नेरुळ-ठाणे संध्या.५.५४ वा संध्या.६.२४वा
ठाणे-नेरुळ संध्या.६.२९वा संध्या ६.५९वा
नेरुळ-ठाणे संध्या. ७.०८वा संध्या. ७.३८वा
ठाणे-पनवेल संध्या.७.४९वा रा.८.४१वा
पनवेल-ठाणे रा. ८.५२वा रा.९.४६वा
ठाणे-पनवेल रा. ९.५४वा रा.१०.४६वा

- Advertisement -

एसी लोकलचे तिकीट दर (ठाणे स्थानकापासून)
स्थानक – तिकीट – साप्ताहिक – मासिक
ऐरोली – 70 -445 – 755
रबाळे – 70 – 445 – 755
घनसोली – 94 – 605 – 1015
कोपरखैरणे – 94 – 605 – 1015
तुर्भे – 140 – 825 – 1455
बेलापुर – 140 – 875 – 1510

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -