मालाडमध्ये भिंत कोसळून २१ जण ठार तर ७८ जण जखमी

मालाडमध्ये भिंत कोसळून २१ जण ठार तर ७८ जण जखमी

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरात सोमवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळल्यामुळे २० जण मृत्यूमुखी पडले असून ४० हून अधिक जण जखमी आहेत. एनडीआरएफ, महापालिका, अग्निशमन दल यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी असून बचावकार्य सुरु आहे. मुंबईत सध्या पावसाचा जोर वाढल्याने बचावकार्यात अडथळा येत असून ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मालाडमध्ये भिंत कोसळून २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ७८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असून यामधील चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहेत. ही घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

 

मृतांची नावे

सिद्धी गोढणकर (३०)
सोनाली गोढणकर (१९)
परशूराम ननावरे ()
लक्ष्मण ननावरे (१५)

मृत्यूंना ५ लाखाची मदत

मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारकडून पाच लाखाची मदत दिली जाणार आहे. तसेच महापालिकडून पाच लाखाची मदत जाहीर करावी. त्याचप्रमाणे याप्रकरणी चौकशी केली जाणार असून संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.  – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट

मालाडच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना शताब्दी रुग्णालयाता दाखल करण्यात आले असून या जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे.


हेही वाचा – पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प; बाहेरगावच्या रेल्वे रद्द

हेही वाचा – सावधान ! मुंबईत पावसाचा रेड अलर्ट; पुढील ६ दिवस धोक्याचे


 

First Published on: July 2, 2019 7:16 AM
Exit mobile version