ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषि सुनक यांच्या नावाची चर्चा

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषि सुनक यांच्या नावाची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाच्या ऋषि सुनक यांच्या नावाची चर्चा होत आहे. सूनक हे इंन्फोसिस कंपनीचे सह संस्थापक असून ते इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून बोरिस यांच्या कन्झर्वेटीव पक्षात अंतर्गत वाद सुरू होते. याचrपार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी अर्थमंत्री ऋषि सुनक यांनी आपल्या पदाचा तडका फडकी राजीनामा दिला. त्यानंतर आरोग्यमंत्री साजिद वाजिद यांनीही राजीनामा दिल्याने देशात खळबळ उडाली. बोरिस यांच्या सरकारमधील नेतेमंडळी अचानक राजीनामे का देत आहेत. हे सामान्य नागरिकांना कळेनासे झाले. तर दुसरीकडे बोरिस यांच्या कन्झर्वेटीव पक्षातील चार केंद्रीय मंत्र्यांनीही राजीनामा दिला. यात सुनक आणि साजिद वाजिद,सायमन हार्ट आणि बँडन लुईसही सामील आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये भारतीय वंशाचे अर्थ मंत्री राहीलेल्या ऋषि सुनक यांनी इतिहासच रचला होता. बोरिस जॉन्सनने यांना अर्थमंत्री बनवले होते. तेव्हापासूनच ऋषि यांचे काम पाहून तेच ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनतील अशा चर्चा सुरू झाल्या. बोरिस यांच्या तुलनेत ऋषि यांचा लोकसंपर्क दांडगा आहे यामुळे सामान्य माणसांना ऋषि यांच्याबदद्ल आपुलकी आहे. कोरोना काळात ठप्प झालेल्या पर्यंटन क्षेत्राला त्यांनी १०,००० कोटींचे पॅकेज दिले.

तर दुसरीकडे ब्रिटनच्या ज्या पार्टीगेट सेक्स स्कँडलवरून खळबळ उडाली होती त्याचा फटका ऋषि यांनाही पडला होता. त्यांच्यावरही याप्रकरणी टीकेची झोड उठली होती. कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये बोरिस यांनी पार्टीचे आयोजन केले होते. त्यावरून जमतेने नाराजी व्यक्त केस्ानंचक त्यांना सगळ्यांची मफीही मागिली. त्यानंतर ऋषीच्या लोकप्रियतेत घट झाली,

भारतीय वंशाच्या ऋषिचा जन्म साऊथकॅप्टन झाला. तर विंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ऑक्सफर्ड युनिवर्सिटीमध्ये शिकले. फिलोसोफी आणि इकोनॉमिक्स मध्ये प्रावीण मिळवले आहे.

 

First Published on: July 7, 2022 5:23 PM
Exit mobile version