‘My Life is Over’ मित्राला मेसेज करुन व्यापाऱ्याची आत्महत्या

‘My Life is Over’ मित्राला मेसेज करुन व्यापाऱ्याची आत्महत्या

लालबागमध्ये व्यवसाकाची गोळ्या झाडून आत्महत्या

लालबागमध्ये एका व्यवसायिकाने गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. लालबागच्या फिन्ले मिलबाहेर ही घटना घडली आहे. गोल्ड कमिशन एजंट अश्विन जैन यांनी कारमध्येच गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. अश्विन यांनी वडीलांच्या पिस्तुलीने गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अश्विन यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मेसेज करुन केली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन जैन यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना मेसेज केला होता. माय लाईफ इज बोअर, मै ये दुनिया छोड कर जा रहा हू असा मेसेज त्यांनी सर्वांना पाठवला होता. अश्विन जैन लालबागच्या खटाब बिल्डिंगमध्ये राहतात काल दुपारपासून ते घरातून निघून गेले होते. मॅसेजबद्दल कळताच अश्विन यांच्या कुटुंबियांनी याबाबत काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान आज दुपारी दीडच्या सुमारास लालबागच्या डॉ. एस एस राव रोडवरील फिन्ले मिलबाहेर पार्क केलेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला.

कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये पिस्तुल सापडली. अश्विन यांनी पिस्तुलने गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अश्विन हे गोल्ड कमिशन एजंट म्हणून व्यवसाय करायचे. त्यांचे काळबादेवी येथे ऑफिस आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिासांनी दिली आहे.

हेही वाचा – 

बेरोजगारीला कंटाळून चार तरुणांनी केली आत्महत्या

सासरच्या लोकांनी मारहाण केली म्हणून पोलिसाची आत्महत्या

‘लिव्ह इन’ लग्नास नकार; तरुणीची आत्महत्या

First Published on: November 23, 2018 10:25 PM
Exit mobile version