आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला काठा एॅड्यूलिस

मुंबई आणि कोलकातामधून निर्यात केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालयाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये यासंदर्भात चौघांना ताब्यात घेवून आेळख पटवण्यात यश आले असुन पोलिस तपास करत आहे. काठा एड्यूलस हा तंबाखूसारखा दिसणारा अंमली पदार्थाचा १३२ किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत ही ३.४ कोटी रुपये इतकी आहे, अशी माहीती मिळाली आहे.

कसा घेतला शोध

ईथिओपिआ इथून मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबई, कोलकाता, जयपुर, दिल्ली आणि नेपाळमध्ये या अमली पदार्थांची निर्यात केली जाणार होती. यासंदर्भातले सगळे पत्रव्यवहार स्पीडपोस्टने करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबई आणि कोलकातामधून हे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये अजूनही काही जणांचा समावेश असल्याची शक्यता आहे. पोलिसांचा यावर अधिक तपास सुरु आहे.

First Published on: July 18, 2018 5:17 PM
Exit mobile version