महापालिकेच्या १० शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई बोर्ड

महापालिकेच्या १० शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई बोर्ड

BMC

जोगेश्वरीतील पुनम नगर शाळेत प्रायोगित तत्त्वावर सुरू केलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेला पालकांनी प्रंचड पसंती दिली. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या आणखी १० शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या शाळांमध्ये जुनिअर केजी, सिनीअर केजी पहिली ते सहावीपर्यंच प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरु केले जाणार आहेत.

शिक्षण समिती बैठकीत होणार निर्णय

जागतिकीकरणात टिकून राहण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहे. त्यामुळे अन्य माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन पालिकेने गत वर्षी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाची शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. के-पूर्व विभागात जोगेश्वरीतील पुनम नगर शाळेत सुरू केलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेला पालकांनी प्रचंड पसंती दिली. महापालिका शाळांतील मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड तसेच एमपीएस शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार्‍या सुविधा या बोर्डाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही पुरवल्या जात आहेत. विशेष म्हणजे पालिकेकडून देण्यात येणार्‍या २७ वस्तू सुद्धा या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही सीबीएसई बोर्डातील शिक्षण परवडत आहे. परिणामी सीबीएसई बोर्डाकडे वाढता कल असल्याने नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सीबीएसई बोर्डाच्या आणखी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव २१ जानेवारीला होणार्‍या शिक्षण समितीच्या बैठकीत सादर होऊन त्याला मंजूरी मिळण्याची शक्यता असल्याचे युवासेनेचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी सांगितले.

सीबीएसई बोर्डाच्या आणखी १० शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव आला आहे. यासंदर्भात २१ जानेवारीला शिक्षण समितीच्या होणार्‍या बैठकीत निर्णय होईल.
– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका

येथे सुरू होणार शाळा

First Published on: January 18, 2021 7:22 PM
Exit mobile version