CoronaVirus: मध्य रेल्वेचा गरजूंना मदतीचा दिला हात

CoronaVirus: मध्य रेल्वेचा गरजूंना मदतीचा दिला हात

'रेल्वे'पिडिया आता ऑनलाईन मोडमध्ये

कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागात स्टेशन परिसरातील गरजू लोकांना सुमारे १००० अन्नाची पाकिटे वाटली. तसेच सर्व विभागांतील रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांची समर्पित पथके चोवीस तास कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, येथील आयआरसीटीसी बेस किचन मध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण (डाळ खिचडी) तयार करीत आहेत. आरोग्यविषयक मानदंडांचे पालन करून सुमारे २००० फूड पॅकेट तयार केली जात आहेत आणि त्याचे वाणिज्यिक विभाग आणि आरपीएफमार्फत वितरित केले जात आहे. याव्यतिरिक्त, कॅटरिंग स्टॉल मालक, वाणिज्य विभाग कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी अन्न पॅकेट वितरणात वैयक्तिक योगदान देत आहेत.

३५० खाद्यान्न पाकिटे स्थानकांजवळील गरजू आणि गरीब लोकांना वाटण्यात

आजच सोलापूर विभागात १४० खाद्यपदार्थांचे पाकिटे, नागपूर १५० खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, पुणे विभाग १५० खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, मुंबई विभाग आणि भुसावळ जवळपास ३५० खाद्यान्न पाकिटे स्थानकांजवळील गरजू आणि गरीब लोकांना वाटण्यात आली आहेत.

४५ जणांनी केले रक्तदान 

लातूर स्थानकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ४५ जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदानानंतर सुरक्षित अंतर, स्वच्छता यासारख्या खबरदारी घेण्यात आल्या. राज्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १९६ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबई १४, पुणे १५, नागपूर १, औरंगाबाद १, यवतमाळ ३ असं ३४ कोरोना रुग्ण हे बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबई आणि ठाणे परिसर १०७, पुणे ३७,नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १,औरंगाबाद १,यवतमाळ ३, मिरज २५,सातारा २,सिंधुदुर्ग १,कोल्हापूर १,जळगाव १,बुलढाणा १ असा तपशील आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.


हेही वाचा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे १.२५ लाख कार्यकर्ते लागले कामाला


 

First Published on: March 29, 2020 8:02 PM
Exit mobile version