मध्य रेल्वेच्या मोटरमनचा ‘ओव्हर टाईम’ला नकार

मध्य रेल्वेच्या मोटरमनचा ‘ओव्हर टाईम’ला नकार

Mumbai Local: हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकी विस्कळीत; पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंट्राग्राफमध्ये स्पार्क

मध्य रेल्वेमध्ये २२९ मोटरमनची पदे रिक्त असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. त्याबाबत मोटरमनमध्ये नाराजीचा सूर आहे. या मोटरमनने शुक्रवारपासून केवळ ८ तास काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गाड्या उशीराने धावणे, काही गाड्या रद्द करणे, असे प्रकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मध्य रेल्वेवर लोकलच्या एकूण १३३ गाड्या असून दिवसाला लोकलच्या १ हजार ७३२ फेर्‍या होतात. या माध्यमातून ४२ लाख प्रवाशी दररोज मध्य रेल्वेवर प्रवास करतात. या गाड्या चालविण्याकरता ८९८ मोटरमनची गरज आहे. परंतु सद्यपरिस्थितीत ६७१ मोटरमन कार्यरत आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण मोटरमनवर येत आहे. याचा विपरीत परिणाम मोटरमनच्या कौटुंबिक जीवनावरही पडत आहे. ओव्हर टाईममुळे मोटरमन आपल्या कुटुंबियांना वेळ देऊ शकत नाहीत. अतिरिक्त कामाचा ताणामुळे त्यांच्याकडून अपघात होण्याचे शक्यता जास्त असते. या संबंधित सेंट्रल रेल्वे मंजदुर संघाकडून रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्या होत्या.मात्र यावर कसलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मोटरमनने ओव्हर टाईम करण्यास नकार दिला आहे.

प्रकृतीवर परिणाम….
एका मोटर मॅननी नाव न छापण्याचा अटीवर महानगरला सांगितले की, मध्य रेल्वेच्या मोटरमनची आज एकदम वाईट परिस्थिती आहे. कामाचा अतिरिक्त ताणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. अशात जर मोटरमनकडून चूक झालीतर अनेकांच्या जीववर बेतू शकते. रेल्वेचे काही हुकुमशाही अधिकारी परिस्थती न पाहता ,मोटरमनला नोकरीवरून काढून टाकतात. नियमानुसार आम्ही काम करतो. मात्र रेल्वेचा ढिसाळ कारभारामुळे आणि मोटरमन कमी असल्यामुळे आम्हाला ओव्हर टाईम करावा लागतो. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागत आहे.

अपघात वाढ…
दिवसेंदिवस मध्य रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकल फेर्‍या सुद्धा वाढविण्यात आल्या आहे. गर्दीच्या वेळेत लोकलमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. या गर्दीमुळे दररोज लोकल अपघातांचे प्रमाण वाढत आहे. २०१७ मध्ये मुंबईत रेल्वे अपघात ६५४ जणांचा मृत्यू झाला , तर १४३४ गंभीर जखमी झाले. या सर्व गोष्टी लक्षात घेता रेल्वेनी वाढत्या प्रवासी संख्या बघता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मध्य रेल्वेमध्ये मोटरमनची २२९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण मोटरमनवर पडत आहे. त्यामुळे मोटरमन ओव्हर टाईम काम करणार नाही. याविषयी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
-ए.के.चांगराणी -सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

First Published on: August 10, 2018 5:45 AM
Exit mobile version