धक्कादायक! फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील चिमुकल्या बाळाची चोरी

धक्कादायक! फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील चिमुकल्या बाळाची चोरी

प्रातिनिधीक फोटो

मुंबईच्या चारकोप भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चिमुकल्या मुलीचं अपहरण करुन १५ हजार रुपयांमध्ये या मुलीची विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विक्री करणाऱ्या पती-पत्नीसह खरेदी करणाऱ्या दाम्पत्याला देखील मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी अवघ्या ४ तासात या घटनेचा तपास लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चिमुकलीची आई चारकोप परिसरातील फुटपाथवर कुटुंबासह झोपली होती. पहाटेच्या दरम्यान या आईला जाग आली तेव्हा त्यांची १ वर्षाची चिमुकली त्यांना त्यांच्या कुशीत दिसली नाही. त्यानंतर तिने सगळीकडे शोधलं मात्र ती मुलगी कुठेही सापडली नाही. त्यानंतर या आईने आज सकाळी ११ वाजता चारकोप पोलिसांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. चिमुकलीच्या अपहरणाची तक्रार दाखल करुन संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने या मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. चार तासाच या बेपत्ता चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या पती-पत्नीची माहिती मिळाली. यासह पोलिसांनी या पती-पत्नीचा पाठलाग करुन जोगेश्वरी परिसरातून विक्री करणाऱ्या पती-पत्नीसह खरेदी करणाऱ्या दम्पत्तीला अटक केली आहे.

बरेच वर्ष मुल नसल्याने घेतला निर्णय

लग्नाला बरेच वर्ष होऊनही मुल होत नसल्याने ते बाळाच्या शोधात होते. त्यानंतर या दाम्पत्याने आरोपी पती-पत्नीशी संपर्क केला आणि त्या चिमुकलीची चोरी करणाऱ्यांनी ३० हजार रुपयांमध्ये चिमुकलीला विकण्याचे ठरवले. मात्र, कमी-जास्त करून अवघ्या १५ हजारांमध्ये या चिमुकलीला विकले गेले.


कांजुरमार्गची जागा महाराष्ट्राचीच; आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला आव्हान

First Published on: November 3, 2020 8:29 PM
Exit mobile version