सिडको घरांच्या लॉटरीत मुदतवाढ; आता २६ नोव्हेंबरला निघणार सोडत

सिडको घरांच्या लॉटरीत मुदतवाढ; आता २६ नोव्हेंबरला निघणार सोडत

सिडकोच्या महागृहनिर्मितीतील ९ हजार आणि जुन्या स्वप्नपूर्ती गृह संकुलातील आठशे घरांची सोडत दिवाळीत २६ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या गृहयोजनेत अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली आहे. सिडकोने एकूण दोन लाख घरनिर्मितीची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरं या योजनेतील हा एक भाग आहे. त्यानुसार गेल्या वर्षी १४ हजार ७३८ घरांची सोडत आणि बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर यंदा सिडकोने ९५ हजार घरांची घोषणा केली असून त्यातील पहिल्या टप्प्यातील ९ हजार २४९ घरांची अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याची मुदत १८ ऑक्टोबर होती. त्याऐवजी ती आता ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे. सिडकोने जुन्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील शिल्लक ८१४ घरांची विक्रीसुद्धा सुरू केली आहे. त्यांची मुदत ५ ऑक्टोबर रोजी संपत होती. त्याऐवजी ती ५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही योजनांचे अर्ज नोंदणी ५ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ आहे.

सिडकोकडून नवी मुंबईत १५ हजार घरांसाठी लॉटरी ११ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली असून १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं आहेत. घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी पुढील वर्षभरात नवी मुंबई क्षेत्रात ५५ हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी १४ हजार ८२० घरांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. ही घरं कळंबोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमध्ये उभारली जात आहेत. यात एकूण ११ गृहप्रकल्पांचा समावेश आहे.

First Published on: October 5, 2019 12:56 PM
Exit mobile version