गटारातील विषारी वायूमुळे ३ सफाई कामगारांचा मृत्यू

गटारातील विषारी वायूमुळे ३ सफाई कामगारांचा मृत्यू

सेफ्टी टँक साफ करताना ७ जणांचा मृत्यू

मीरा- भाईंदरमध्ये ३ सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मीरा- भाईंदरच्या प्रेमनगरमध्ये महापालिकेच्या एसटीपी प्लांटमध्ये गटार सफाईचे काम सुरु होते. गटार साफ करण्यासाठी ५ कामगार गटारात उतरले होते. गटातील विषारी वायूमुळे यामधील तीन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर दोन कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असून नजीकच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हे कामगार कंत्राटी असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

अशी घडली घटना

आज दुपारी २ च्या सुमारास जुनी म्हाडा वसाहतीतील शांती गार्डनजवळ मीरा भाईंदर महापालिकेच्या सांडपाणी शुद्धिकरण प्रक्ल्पातील गटारमध्ये गाळ साफ करण्यासाठी कामगार गटारात उतरले होते. गटाराचे झाकण उघडून आधी एक कामगार गटारात उतरला त्याचा श्वास गुदमुरुन तो खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर दोन कामगारांचा यामध्ये मृत्यू झाला. गटारातील विषारी वायुमुळे या तीन ही कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेमध्ये दोन कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत.

कंत्राटदारावर गुन्हा दाखल होणार

या दुर्घटनेमध्ये ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंताने हे आदेश दिले असल्याचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, मुझ्फ्फर मोहलीक (२४ वर्ष), रफिक मंडल (५० वर्ष) आणि अफ्तार मुल्ला ( ४९ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या सफाई कामगारांची नावं आहेत.

हेही वाचा – 

ड्रेनेजमध्ये गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू!

First Published on: January 16, 2019 9:29 PM
Exit mobile version